IPL 2022 Auction: ‘हे’ आहेत पहिल्या तासाभरातले Sold आणि unsold खेळाडू, एका नवख्या इंग्लिश खेळाडूने कमावले 11.50 कोटी

IPL 2022 Auction: आज दुसऱ्यादिवशी लिलावाला सुरुवात झाल्यानंतर लियम लिविंगस्टोन (Liam Livingstone) हा पहिल्या तासाभरातला सर्वात महागडा खेळाडू ठरला.

IPL 2022 Auction: 'हे' आहेत पहिल्या तासाभरातले Sold आणि unsold खेळाडू, एका नवख्या इंग्लिश खेळाडूने कमावले 11.50 कोटी
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 1:03 PM

TATA IPL 2022 Mega Auction चा आज दुसरा दिवस आहे. फ्रेंचायजींनी खेळाडूंवर बोली लावायला सुरुवात केली आहे. काल पहिल्यादिवशी एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. यात 74 खेळाडूंना विकत घेतलं. 23 खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. लिलावात विकत घेतलेल्या 74 खेळाडूंमध्ये 20 परदेशी खेळाडू होते. आज दुसऱ्यादिवशी लिलावाला सुरुवात झाल्यानंतर लियम लिविंगस्टोन (Liam Livingstone) हा पहिल्या तासाभरातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने नुकत्यात संपलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात (West indies tour) इंग्लंडकडून खेळताना तीन सामन्यात 33 धावा आणि चार विकेट घेतल्या होत्या. टी 20 मध्ये त्याने शतकही झळकावलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला मोठ्या किंमतीला विकत घेतलं.

1 कोटींच्या बेस प्राईसवर केकेआरने मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात घेतलं. रहाणेवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.

एडन मार्क्रामसाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये बिडींग वॉर झालं. परंतु हैदराबादने मोठी बोली लावत मार्क्रामला आपल्या ताफ्यात घेतलं. हैदराबादने त्याच्यासाठी 2.6 कोटींची बोली लावली.

दिल्ली कॅपिटल्सने 1.10 कोटी रुपयांच्या बोलीवर मनदीप सिंहला आपल्या ताफ्यात घेतलं.

टी-20 क्रिकेटमध्ये सध्या जगभरात ज्याच्या नावाचा डंका वाजतोय त्या डेव्हिड मलानसाठी आयपीएलमधील कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे दोन्ही खेळाडी अनसोल्ड राहिले.

इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंच या दोन्ही खेळाडूंवर आयपीएलमधील कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले. मॉर्गनने गेल्या वर्षी कोलकात्याला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. तर फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने नुकताच टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे.

भारताच्या कसोटी संघातील भरवशाचा फलंदाज अशी ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि सौरभ तिवारी या दोन खेळाडूंवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले.

लियम लिविंगस्टोन या इंग्लिश खेळाडूसाठी आयपीएल फ्रँचायझींमध्ये मोठं बिडींग वॉर झालं. आधी कोलकाता नाईट रायडर्स आणि नंतर पंजाब किंग्समध्ये हे वॉर सुरु होतं. मात्र कोलकात्याच्या पर्समध्ये पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी 7 कोटींच्या बोलीनंतर माघार घेतली. मात्र नंतर गुजरात टायटन्सने यात उडी घेतली. 10 कोटींच्या बोलीनंतर गुजरातने माघार घेतली, त्यानंतर हैदराबादने यात उडी घेत हे वॉर 11 कोटींच्या पुढे नेलं. अखेर हे बिडींग वॉर पंजाबने जिंकलं. पंजाब किंग्सने 11.50 कोटींच्या बोलीवर लिविंगस्टोनला आपल्या ताफ्यात घेतलं.

डॉमिनिक ड्रेक्स या अष्टपैलू खेळाडूसाठी गुजरात टायटन्सने 1.10 कोटींची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. भारताचा फिरकीपटू जयंत यादवसाठी लखनौ आणि गुजरातने बिडींग वॉर केलं. अखेर गुजरात टायटन्सने 1.70 कोटींच्या बोलीवर हा अष्टपैलू खेळाडू खरेदी केला.

गुजरातने सलग तिसरा खेळाडू खरेदी केला आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकरसाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबतच्या बिडींग वॉरनंतर गुजरातने विजयला आपल्या ताफ्यात घेतलं. त्याच्यासाठी गुजरातने 1.40 कोटी रुपये मोजले.

बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.