IPL 2022: पैसाच पैसा! यंदा नुसत्या स्पॉन्सरशिपमधून BCCI ची रग्गड कमाई; आकडा वाचून चमकतील डोळे

IPL 2022 Sponsors: इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) श्रीमंती कैकपटीने वाढली. दरवर्षी आयपीएलमुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात वाढच होत आहे.

IPL 2022: पैसाच पैसा! यंदा नुसत्या स्पॉन्सरशिपमधून BCCI ची रग्गड कमाई; आकडा वाचून चमकतील डोळे
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 1:12 PM

IPL 2022 Sponsors: इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) श्रीमंती कैकपटीने वाढली. दरवर्षी आयपीएलमुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात वाढच होत आहे. आयपीएल स्पर्धेला मोठे प्रायोजक लाभले आहेत. यंदाच्या आयपीएलच्या (IPL) सेंट्रल स्पॉन्सरशिप्समधून बीसीसीआय 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करु शकते. आयपीएलच्या आतापर्यंतच्या सीजन्समधील स्पॉन्सरशिपमधून येणारी ही रेकॉर्ड कमाई आहे. आयपीएलचा यंदाचा 15 वा सीजन आहे. बीसीसीआयने यंदा टायटल स्पॉन्सरशिपसाठी टाटा (TATA) बरोबर करार केला आहे. त्याशिवाय दोन नवीन असोसिएसट प्रायोजकही स्पर्धेला लाभले आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने अलीकडेच रुपे आणि स्विगी इन्स्टामार्ट बरोबर नवीन करार केला आहे. हे दोन ब्रँड आयपीएलचे सेंट्रल स्पॉन्सर आहेत. आयपीएलसाठी टॉपचे नऊ ब्रँड बोर्डाकडे आहेत.

कोणा बरोबर किती कोटीचा करार

मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाने रुपे बरोबर 42 कोटी आणि स्विगी इन्स्टामार्ट बरोबर 44 कोटी रुपयांचा वार्षिक करार केला आहे. “आयपीलचं ब्रँड म्हणून काय मुल्य आहे, ते यातून दिसून येतं. या नव्या स्पॉन्सरशिपमुळे निश्चितच आम्हाला आनंद झाला आहे. मला आकड्याबद्दल बोलायचे नाही. पण यावर्षी आयपीएल 2022 मध्ये आम्ही स्पॉन्सरशिपमधून सर्वाधिक कमाई करु” असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.

आठशे कोटी कसे मिळणार

आयपीएल स्पर्धेच्या प्रायोजकांनी संख्या वाढतेय आणि नवीन टायटल स्पॉन्सरशिपमुळे बीसीसीआय प्रायोजकत्वातूनच 800 कोटीपेक्षा जास्त कमाई होऊ शकते. टाटा ग्रुप बीसीसीआयला 335 कोटी देणार आहे. त्याशिवाय नव्या प्रायोजकांकडून मिळणारी रक्कम वेगळी आहे.

वीवो बीसीसीआयला 450 कोटी रुपये देणार

आयपीएल 2022 च्या सीजनमध्ये 10 संघ खेळणार आहेत. वीवो कडून बीसीसीआयला 996 कोटी रुपये मिळणार होते. वीवोने दोन्ही सीजनसाठी 484 आणि 512 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. याआधी एका सीजनसाठी 440 कोटी रुपये द्यायचं ठरलं होतं. टाटा राइटसची फीज म्हणून दोन सीजनसाठी प्रत्येकी 335 कोटी रुपये देणार आहे. करारातून बाहेर पडण्याची रक्कम म्हणून वीवो बीसीसीआयला 450 कोटी रुपये देणार आहे. यामुळे बीसीसीआयची 1120 कोटी रुपयांची कमाई होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.