CSK IPL 2022: …आणि मैदानातच धोनी मुकेश चौधरीवर संतापला
CSK IPL 2022: "धोनी मला त्या षटकाबद्दल विशेष काही बोलला नाही. स्टम्प टू स्टम्प मला त्याने गोलंदाजी करायला सांगितली. नवीन काही ट्राय करु नको, असं त्याचं म्हणण होतं" असं मुकेशने सामना संपल्यानंतर सांगितलं.
मुंबई: एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कॅप्टनशिप स्वीकारताच पुन्हा एकदा टीम विजयी रुळावर परतली आहे. रविवारी चेन्नईने सनरायजर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव केला. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या पुण्याच्या स्टेडियमवर ही मॅच झाली. IPL 2022 मध्ये धोनी या सामन्यात एका टप्प्यावर खूपच चार्ज झालेला दिसला. युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीवर (Mukesh Choudhary) तो रागवला सुद्धा. सनरायजर्स हैदराबादचा संघ धावांचा पाठलाग करत होता. शेवटच्या षटकात मुकेशने वाईड बॉल टाकला. त्यामुळे धोनी खूपच चिडला. निकोलस पूरन स्ट्राइकवर होता. मुकेशने शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू लेग साइडला टाकला. हा चेंडू वाईड होता. त्यावेळी धोनी मुकेशवर रागवल्याचं दिसलं.
नवीन काही ट्राय करु नकोस
“धोनी मला त्या षटकाबद्दल विशेष काही बोलला नाही. स्टम्प टू स्टम्प मला त्याने गोलंदाजी करायला सांगितली. नवीन काही ट्राय करु नको, असं त्याचं म्हणण होतं” असं मुकेशने सामना संपल्यानंतर सांगितलं.
नवीन काही ट्राय करु नको
युवा मुकेश चौधरीने सीएसकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने 46 धावा देत चार विकेट घेतल्या. शेवटच्या षटकात त्याने 24 धावा दिल्या. धोनीचा गोलंदाजांना नेहमी एकच सल्ला असतो. “मी नेहमीच माझ्या बॉलर्सना सांगतो, तुम्हाला एका ओव्हरमध्ये चार षटकार बसतील. पण तुम्ही दोन चेंडू राखून ठेवा, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ते दोन चेंडू तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी उपयोगी पडतील” असं धोनी म्हणाला.
ऋतुराज गायकवाडचा भागीदारीचा नवा विक्रम
नवीन जोडीदार डे्वॉन कॉनवेसोबत मिळून ऋतुराज गायकवाडने रविवारी रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. IPL 2022 मध्ये काल चेन्नई सुपर किंग्सचा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना झाला. ही भागीदारी पाहून फाफ डू प्लेसिसचा आता जळफळाट होईल, असं ऋतुराज गायकवाड गमतीने म्हणाला. फाफ डू प्लेसिस मागच्या सीजनपर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता. पण आता तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन आहे. डेवॉन कॉनवे न्यूझीलंड संघाकडून खेळतो. SRH विरुद्धच्या सामन्यात काल कॉनवेसोबत मिळून त्याने सलामीसाठी 182 धावांची भागीदारी केली. ऋतुराज-कॉनवे जोडीने फाफ डू प्लेसिस आणि शेन वॅटसन जोडीचा 2020 मधील रेकॉर्ड मोडला. फाफ डू प्लेसिसने वॅटसन सोबत मिळून सीएसकेसाठी 181 धावांची भागीदारी केली होती. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ही भागीदारी केली होती