IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल

या कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर BCCI वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. बीसीसीआयने प्लान B बनवला आहे.

IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 9:48 AM

मुंबई: सध्या संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. या रुग्णवाढीमुळे IPL च्या आयोजनाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात कोरोना रुग्णवाढ होत असताना, मुंबई-महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती नाहीय. या कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर BCCI वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. बीसीसीआयने प्लान B बनवला आहे. या प्लाननुसार IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात आयोजित केला जाऊ शकतो. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे येथे असलेलं महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण IPL चा सीजन खेळवण्याचा BCCI चा विचार आहे. (IPL 2022 Cricket Board looking to stage the entire IPL in Maharashtra)

शरद पवारांची घेतली भेट या संदर्भात पाच जानेवारीला बीसीसीआयचे अंतरीम CEO व आयपीएलचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर हेमांग अमीन यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांची भेट घेतली. काही दिवसांनी अमीन आणि पाटील यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बीसीसीआयच्या प्रस्तावाला शरद पवारांनी हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या दहा दिवसात बीसीसीआय आणि एमसीएचे अधिकारी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्स सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आवश्यक परवानग्या मिळवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल.

कुठलीही हलगर्जी करणार नाही कोविड बाबत कुठलीही हलगर्जी केली जाणार नाही. कठोर बायोबबल नियमांचे पालन करु स्पर्धा खेळवली जाईल. प्रेक्षकांना मैदानावर परवानगी नसेल. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांची वेळोवेळी चाचणी केली जाईल. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

शनिवारी महाराष्ट्रात 40,925 तर मुंबईत 20,971 कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी महाराष्ट्र सरकारने नव्या निर्बंधाबाबत आदेश जारी करताना काही नियमांचे कठोर पालन होणार असेल, तर क्रीडा स्पर्धांना परवानगी दिली आहे.

रणजी स्पर्धा पुढे ढकलली यंदाच्या आयपीएल हंगामासाठी अजून मेगा ऑक्शन पार पडायचं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा देशातच आयोजित करण्याचा बीसीसीआय गांभीर्याने विचार करतेय. बीसीसीआयने सध्याची कोविड स्थिती लक्षात घेऊन रणजी करंडकासह काही महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. सध्या बीसीसीआयकडे महाराष्ट्राचा पर्याय आहे, पण इथे सुद्धा स्पर्धा आयोजित करणं शक्य झालं नाही, तर मग स्पर्धा परदेशात खेळवली जाईल असे सूत्राने सांगितले.

संबंधित बातम्या: IND vs SA: सिराजमुळे टीम मॅनेजमेंटसमोर सिलेक्शनचा पेच, द्रविड-कोहली कोणावर विश्वास दाखवणार? मित्र धोनीसाठी धावून गेला जाडेजा, KKR ची बोलती केली बंद, IPL आरंभाआधीच सुरु झाली ठसन Jasprit Bumrah: केपटाऊन कसोटीआधी जसप्रीत बुमराह झाला भावूक, दिला खास संदेश

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.