IPL 2022: रोहित, विराट, धोनीचा ऑक्शनमध्ये सहभाग अशक्य, CSK, MI, DC, RCB, KKR कोणते खेळाडू रिटेन करणार?

इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) जुन्या आठ फ्रेंचायझी ज्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार आहेत त्यांच्या नावांची घोषणा 30 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे. जवळपास सर्वच संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी तयार केली आहे.

IPL 2022: रोहित, विराट, धोनीचा ऑक्शनमध्ये सहभाग अशक्य, CSK, MI, DC, RCB, KKR कोणते खेळाडू रिटेन करणार?
IPL Teams
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 1:04 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) जुन्या आठ फ्रेंचायझी ज्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार आहेत त्यांच्या नावांची घोषणा 30 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे. जवळपास सर्वच संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी तयार केली आहे. 30 नोव्हेंबरला या याद्या प्रसिद्ध होतील. त्यानंतर आपल्याला कळेल की, आगामी आयपीएलपूर्वीच्या मेगा ऑक्शनमध्ये कोणकोणते मोठे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. (IPL 2022: CSK, MI, DC, RCB, KKR, RR set to retain THESE players before mega auction)

रिटेंशनचे नियम

30 नोव्हेंबरपर्यंत सर्व आठ जुन्या फ्रेंचायझी संघांना त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागणार आहे. आठ फ्रेंचायझी संघ जास्तीत जास्त चार खेळाडू संघात कायम ठेवू शकतात, ज्यामध्ये तीन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू संघात कायम ठेवता येईल. किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना संघात कायम ठेवता येईल. यावेळी कोणत्याही फ्रेंचायझी संघाकडे RTM म्हणजेच राईट टू मॅचचा पर्याय नसेल.

किती खेळाडू रिटेन केल्यानंतर किती पैसे वाचणार?

सर्व फ्रेंचायझी संघांकडे 90 कोटी रुपयांची पर्स असेल. फ्रेंचायझी संघाने चार खेळाडूंना कायम ठेवल्यास त्यांच्या पर्समधील 42 कोटी रुपये कापले जातील. तीन खेळाडूंना कायम ठेवल्यास 33 कोटी रुपये पर्समधून कमी होतील. दोन खेळाडूंना कायम ठेवल्यास 24 कोटी रुपये पर्समधून कापले जातील आणी एक खेळाडू कायम ठेवल्यास 14 कोटी रुपये पर्समधून कमी होतील.

दोन नवीन फ्रेंचायझी संघांसाठी काय नियम असतील

लखनौ आणि अहमदाबादचे संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहेत. 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान मेगा ऑक्शनपूर्वी, या दोन फ्रेंचायझी संघांना लिलावात येणारे पहिले तीन खेळाडू निवडण्याचा पर्याय असेल. या यादीत दोनपेक्षा जास्त भारतीय खेळाडू घेता येणार नाहीत. तसेच केवळ एकच परदेश खेळाडू या पद्धतीने संघात घेता येईल.

CSK, MI, DC, RCB, KKR आणि RR ने संघात कायम ठेवलेले खेळाडू

  • चेन्नई सुरपकिंग्स : एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली/सॅम करन
  • दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि अॅनरिच नॉखिया.
  • मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, इशान किशन (किंवा सूर्यकुमार यादव)
  • कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नाराण, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर
  • रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल
  • राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (14 कोटी रुपये)
  • सनरायझर्स हैदराबाद : केन विलियम्सन, राशिद खान

इतर बातम्या

Rahul chahar : भर मैदानात अंपायरवर का भडकला राहुल चहर? राहुल चहरनं अंपायसमोर केलं हे कृत्य…

Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल

Ind vs nz test series : दुसऱ्या कसोटीत कुणाला बाहेर बसावं लागणार? कोण मैदानात असणार?

(IPL 2022: CSK, MI, DC, RCB, KKR, RR set to retain THESE players before mega auction)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.