IPL 2022 CSK vs RCB MS Dhoni: विकेट गेल्यानंतर सेलिब्रेट न करता धोनीने आधी मुकेश चौधरीच्या खांद्यावर हात टाकला, कारण…
IPL 2022 CSK vs RCB MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीसाठी (Mukesh Choudhary) कालचा दिवस फारसा चांगला ठरला नाही.
मुंबई: चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीसाठी (Mukesh Choudhary) कालचा दिवस फारसा चांगला ठरला नाही. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात तो चमक दाखवू शकला नाही. तीन षटकात 40 धावा देऊन त्याने एक विकेट घेतला. त्याशिवाय तीन झेल सोडले. आयपीएलच्या छोट्या फॉर्मेटमध्ये एक कॅच सुटणही महाग ठरु शकतं. कॅच सुटल्यानंतर सहाजिकच कुठल्याही खेळाडूंचा आत्मविश्वास कमी होतो. अशावेळी त्या खेळाडूला धीर देणं, त्याचा आत्मविश्वास उंचावण खूप महत्त्वाचं असतं. अन्यथा तो खेळाडू मानसिकदृष्ट्या खचू शकतो. काल मुकेशने तीन झेल सोडल्यानंतर लगेच महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) मुकेशच्या दिशेने धाव घेतली. आपला हात त्याच्या खांद्यावर ठेऊन त्याला काही सल्ले दिले व त्याचा आत्मविश्वास उंचावला.
15 व्या षटकात सीएसकेचा स्पिनर माहीश तीक्ष्णााने आरसीबीच्या शाहबाज अहमदची विकेट काढली होती. विकेट काढल्यानंतर सेलिब्रेशन करण्याऐवजी धोनी आधी मुकेश चौधरीकडे गेला व त्याच्याशी संवाद साधला. मुकेशने त्याआधी तीन झेल सोडले होते.
धोनीच्या कृतीचं कौतुक
एमएस धोनीच्या या कृतीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. धोनीने मुकेश चौधरीच्या खांद्यावर हात टाकून त्याचा आत्मविश्वास उंचावला. डी.वाय.पाटील स्टेडियमवर मुकेशसाठी कालचा दिवस चांगला ठरला नाही. धोनी मुकेशला समजावतानाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Dhoni straight went to Mukesh Choudhary who dropped catch after wicket #CSKvsRCB #IPL2022 pic.twitter.com/08DKl2U7zJ
— Gauπav (@virtual_gaurav) April 12, 2022
मुकेश डीप मिडविकेटला उभा होता
आठव्या ओव्हरमध्ये मुकेश चौधरी डीप मिड विकेटला उभा होता. त्यावेळी त्याने सुयश प्रभुदेसाईचा झेल सोडला. झेल घेण्यासाठी तो चेंडूपर्यंत पोहोचला नाही. ती बाऊंड्री गेली. त्यानंतर ड्वेयन ब्राव्होच्या 12 व्या षटकात मुकेशने डीप मिडविकेटलाच एक सोपा झेल सोडला.
That’s Captain MS Dhoni for you ? pic.twitter.com/cVQoNL3SEV
— Rohan MSDian™? (@Csk_army1) April 12, 2022
MS Dhoni straight went to console Mukesh Choudhary after Shahbaz Ahmed’s wicket. Great to see the gesture by MS. pic.twitter.com/BcQ6ITxn1b
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 12, 2022
चार पराभवानंतर पहिला विजय
त्यानंतर 15 व्या षटकात मुकेशने धोकादायक दिनेश कार्तिकचा पॉईंटला सोपा झेल सोडला. त्यानंतर माहीश तीक्ष्णाने शाहबाज अहमदला बोल्ड केलं. धोनी त्यानंतर मुकेशकडे गेला व त्याच्याशी संवाद साधला. गोलंदाजी करताना नव्या चेंडूने मुकेशने विराट कोहलीची विकेट मिळवली. पण त्यानंतर तो चमक दाखवू शकला नाही. चेन्नई सुपर किंग्सने काल सलग चार पराभवानंतर आरसीबीवर पहिला विजय मिळवला.