DC vs LSG IPL 2022: नाव गौतम पण ‘राग’ गंभीर, शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद, पहा VIDEO

IPL 2022: गंभीरसह सर्व टीम टेन्शनमध्ये होती. पण मार्कस स्टॉयनिसने विजय मिळवून दिला, तेव्हा गंभीर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही.

DC vs LSG IPL 2022: नाव गौतम पण 'राग' गंभीर, शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद, पहा VIDEO
गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 3:11 PM

मुंबई: लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow super giants) इंडियन प्रीमियर लीगचा हा पहिलाच सीजन आहे. पहिल्याच मोसमात या टीमने कमालीचं प्रदर्शन केलं आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणारी लखनौची टीम सातत्याने विजय मिळवत आहे. रविवारी या टीमने दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. गुणतालिकेत लखनौची स्थिती आता आणखी मजबूत झाली आहे. दिल्लीला हरवल्यानंतर गुणतालिकेत लखनौची टीम आता दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये (Playoff) दाखल होण्याचा त्यांचा मार्ग अजून सोपा झालाय. लखनौने अटी-तटीच्या सामन्यात दिल्लीवर विजय मिळवला. सामन्यादरम्यान लखनौच्या गोटात वातावरण सुद्धा थोडं तापलं होतं. संघाचा मेंटॉर म्हणजे मार्गदर्श गौतम गंभीर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. लखनौने दिल्लीला सहा धावांनी हरवलं. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 21 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर कुलदीप यादवने षटकार मारला. दुसरा चेंडू वाइड टाकला. त्यानंतर एक धाव काढली. अक्षर पटेलने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. पण विजय मिळू शकला नाही.

तोंडातून निघाले अपशब्द

शेवटच्या षटकात कुलदीपने षटकार मारला. त्यावेळी गंभीरसह सर्व टीम टेन्शनमध्ये होती. पण मार्कस स्टॉयनिसने विजय मिळवून दिला, तेव्हा गंभीर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्याच्या तोंडातून शिवी निघाली. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

असा होता सामना

लखनौने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौकडून पुन्हा एकदा कॅप्टन केएल राहुलने दमदार फलंदाजी केली. त्याने 77 धावा केल्या. त्याने 51 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार आणि एक षटकार लगावला. दीपक हुड्डा बरोबर मिळून त्याने चांगली भागीदारी केली. दीपकने 34 चेंडूत 52 धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. क्विंटन डिकॉकने 23 धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने नाबाद 17 धावा केल्या. दिल्लीची टीम बऱ्याच प्रयत्नानंतर लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यांनी 20 षटकात 189 धावा केल्या. ऋषभ पंतने 44 धावा केल्या. अक्षर पटेलने नाबाद 42 धावा केल्या. रोव्हमॅन पॉवेलने 35 धावा केल्या. मिचेल मार्शने 37 तर कुलदीप यादव 16 धावांवर नाबाद राहिला. लखनौकडून मोहसीन खानने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.