IPL 2022 DC vs RCB Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

बँगलोरचा संघ आपला नवा कर्णधार फाफ डू प्लेसिससह मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर दिल्लीची कमान युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या हातात आहे. उभय संघांमधील हा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

IPL 2022 DC vs RCB Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
Delhi Capitals vs Royal Challengers BangaloreImage Credit source: RCB / DC - Twitter
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 8:00 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) शनिवारी डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. या दिवशी दोन सामने पाहण्याचा आनंद क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर एकमेकांशी दोन हात करणार आहेत. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाची स्थिती फार चांगली नाही. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत तर दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्लीने पहिल्याच सामन्यात मुंबईवर विजय मिळवत स्पर्धेची धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र पुढच्या सामन्यांमध्ये त्यांच्या खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे, जर आरसीबीबद्दल बोलायचे झाले तर, पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यावेळी बँगलोरचा संघ आपला नवा कर्णधार फाफ डू प्लेसिससह मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर दिल्लीची कमान युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या हातात आहे. उभय संघांमधील हा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडेवर गेल्या पाचपैकी चार सामन्यात संघाने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत विजय मिळवला आहे, त्यामुळे या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका निभावेल. दोन्ही संघांमधील सामन्यांच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर ते आरसीबी या विजयाचा मोठा दावेदार असल्याचे मानले जात आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 16 एप्रिल (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहता येईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : हार्दिक पांड्या जॉस बटलरमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस, पांड्या काही धावांनी पिछाडीवर

Purple Cap 2022 : पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे, जाणून घ्या कोणते खेळाडू आहेत टॉप 10 मध्ये

IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.