DC vs KKR IPL 2022 Match Prediction & playing XI: दिल्ली कॅपिटल्स-केकेआर भिडणार, अशी असेल दोन्ही टीम्सची प्लेइंग 11
DC vs KKR IPL 2022 Match Prediction & playing XI: केकेआरने या स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. पण आता त्यांची टीम विजयी मार्गावरुन भरकटली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरने सलग चार सामने गमावले आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (DC vs KKR) सामना होणार आहे. दोन्ही टीम्ससाठी उद्याच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. तीन विजय आणि चार पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा संघ सातव्या स्थानावर आहे, तर कोलकाता नाइट रायडर्सची टीम आठव्या नंबरवर आहे. मागच्या सामन्यात कोलकाताचा गुजरात टायटन्सने, (Gujarat Titans) तर दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सने पराभव केला होता. दिल्ली आणि राजस्थानचा सामना खेळापेक्षा वादासाठी जास्त चर्चेत राहिला. याच मॅचमध्ये नो-बॉलवरुन मोठा वाद झाला. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने क्रीझवरील फलंदाजांना माघारी बोलावले होते. अखेर शेन वॅटसन यांनी कानउघडणी केल्यानंतर ऋषभ पंत शांत झाला होता. हा सर्व वाद मागे सोडून, उद्याच्या सामन्यात केकेआरवर विजय मिळवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.
DC vs KKR मध्ये कोण जास्त वेळा विजयी ठरलं आहे?
केकेआरने या स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. पण आता त्यांची टीम विजयी मार्गावरुन भरकटली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरने सलग चार सामने गमावले आहेत. कोणी किती सामने जिंकलेत? कोण किती सामने हरलं? हे पाहिलं, तर कोलकाताची बाजू वरचढ आहे. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 30 सामने झालेत. त्यात दिल्लीने फक्त 13 मॅच जिंकल्यात तर कोलकाताने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामन्याचा काही निकाल लागला नाही. या सीजनमध्ये 10 एप्रिलला दिल्ली आणि कोलकातामध्ये एक सामना झाला. या मॅचमध्ये दिल्लीने कोलकाताला 44 धावांनी हरवलं.
दिल्लीने कुठे सुधारणा केली पाहिजे?
दिल्लीची फलंदाजी मजबूत आहे. डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि रोव्हमॅन पॉवेल सारखे दमदार फलंदाज या संघात आहेत. केकेआरच्या गोलंदाजांसमोर त्यांना सर्तक रहाण्याची गरज आहे. वॉर्नरने सलग तीन अर्धशतक झळकावली आहेत. पृथ्वी शॉ ला सुद्धा चांगली सुरुवात मोठ्या खेळीमध्ये बदलण्याची आवश्यकता आहे. कॅप्टन पंतसह तीन ऑलराऊंडर ललित यादव, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल. पंतमध्ये कुठलाही सामना फिरवण्याची क्षमता आहे. पण त्याला अजून आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवता आलेला नाही.
KKR साठी काय चिंतेचा विषय
श्रेयस अय्यर मागच्या सामन्यात चालला नव्हता. सॅम बिलिंग्स आणि सुनील नारायण ही सलामीची जोडी फेल ठरली होती. श्रेयस, नितीश राणा, रिंकू सिंह आणि वेंकटेश अय्यर यांच्यासाठी दिल्लीच्या फिरकी गोलंदाजीचा सामना करणं सोपं नसेल. केकेआरसाठी उमेश यादव, टिम साउदी चांगली गोलंदाजी करत आहेत. पण वरुण चक्रवर्तीची फिरकी गोलंदाजी चालत नाहीय. हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.
केकेआरची संभाव्य Playing 11
ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सर्फराझ खान, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफीझुर रहमान, खलील यादव,
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing 11
श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, टिम साउदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती,