Who is Ayush Badoni: राहुल द्रविड यांनी सांगूनही आयुष बदोनीकडे दुर्लक्ष, सिलेक्टर्सना आज लाज वाटत असेल

सध्या क्रिकेट वर्तुळात आयुष बदोनी (Ayush Badoni) या नावाची बरीच चर्चा आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) या खेळाडूने आपली क्षमता दाखवून दिली.

Who is Ayush Badoni: राहुल द्रविड यांनी सांगूनही आयुष बदोनीकडे दुर्लक्ष, सिलेक्टर्सना आज लाज वाटत असेल
राहुल द्रविड-आयुष बदोनी Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 4:20 PM

मुंबई: सध्या क्रिकेट वर्तुळात आयुष बदोनी (Ayush Badoni) या नावाची बरीच चर्चा आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) या खेळाडूने आपली क्षमता दाखवून दिली. लखनौचा संघ अडचणीत असताना आयुषने ऑलराऊंडर दीपक हुड्डा बरोबर पाचव्या विकेटसाठी 87 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याशिवाय 41 चेंडूत 54 धावा चोपल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार होते. आयुषची ही कामगिरी बघून दिल्ली क्रिकेट संघटनेशी संबंधित काही जणांना स्वत:चीच लाज वाटत असेल. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने चमकदार खेळ दाखवला. समोर राशिद खान, हार्दिक, पंड्या, मोहम्मद शमी सारखे गोलंदाज होते. पण त्यांचा सामना करताना तो डगमगला नाही. उलट त्यांच्या गोलंदाजीवर तो तुटून पडला.

ऋषभ पंत नंतर दिल्लीतून येणारा एक मोठा टॅलेंटेड खेळाडू

ऋषभ पंत नंतर दिल्लीतून येणारा तो एक मोठा टॅलेंटेड खेळाडू असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. वयाच्या 14 व्या वर्षापासून ज्यूनियर लेव्हलवर त्याने आपली प्रतिभा दाखवून दिली. 2018 मध्ये अंडर 19 संघात आयुषला संधी मिळाली. त्याने एक मॅच विनिंग खेळी केली. त्यानंतर तो गायब झाला. फेब्रुवारी 2020 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप खेळण्यासाठी तो पात्र ठरला नाही. त्यावेळी अंडर 19 संघाचे कोच राहुल द्रविड आणि व्हीव्ही रमन यांनी दिल्लीच्या सिलेक्टर्सना एक मेसेज पाठवला होता. त्यांनी मधल्या फळीत खेळणाऱ्या आयुष बदोनीला थेट सिनियर संघात स्थान देण्याची सूचना केली होती.

आयुष बदोनीची काळजी घ्यायला सांगितली होती

राहुल द्रविड यांनी दिल्ली क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष अतुल वासन यांना आयुष बदोनीची काळजी घ्यायला सांगितली होती. पण दिल्लीचे सिलेक्टर्स आणि कोचने दुर्लक्ष केलं. सिलेक्टर्स बदलले पण आयुषच्या वाट्याला संधी काही आली नाही. जानेवारी 2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेसाठी आयुष बदोनची निवड झाली. पण पाच पैकी त्याला फक्त एका सामन्यात संधी मिळाली. तेव्ही सातव्या क्रमांकावर तो फलंदाजीला आला. आयुष बदोनीचे वडिल डॉक्युमेंट्री फिल्ममेकर आहेत. आयुष बदोनीने गुजरात टायटन्स विरुद्धची अर्धशतकी खेळी दिवंगत कोच तारक सिन्हा यांना समर्पित केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.