IPL 2022, Orange Cap: RCB चा पहिला विजय, फाफ डु प्लेसी ऑरेंज कॅपचा मानकरी, पर्पल कॅपमध्ये कोण आघाडीवर? जाणून घ्या…
IPL 2022 orang cap: पहिल्यांदाच यंदाच्या सीजनमधली ऑरेंज कॅप देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डु प्लेसीला ही कॅप मिळाली आहे.
मुंबई: आयपीएल (IPL) 2022 चा सहावा सामना बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये (KKR vs RCB) खेळला गेला. या सामन्यात RCB ने KKR वर मात करुन स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. फाफ डु प्लेसीच्या (Faf du plessis) नेतृत्वाखाली आरसीबीने पहिला विजय मिळवला. RCB च्या गोलंदाजांनी काल कमालीची गोलंदाजी केली. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजी बद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण काल आरसीबीच्या गोलंदाजांनी सगळ्यांचेच अंदाज चुकीचे ठरवत सर्वोत्तम गोलंदाजी केली. केकेआरच्या संपूर्ण संघाला अवघ्या 128 धावात गुंडाळलं. टी 20 क्रिकेटमध्ये 129 धावा हे खूप माफक लक्ष्य समजलं जातं. पण हे लक्ष्य गाठताना आरसीबीची खूप दमछाक झाली. फाफ डु प्लेसी आणि विराट कोहली सारखे दिग्गज फलंदाज असलेल्या या संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
कुठल्या सामन्यात फटकावल्या सर्वाधिक धावा?
या सामन्यानंतर पहिल्यांदाच यंदाच्या सीजनमधली ऑरेंज कॅप देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डु प्लेसीला ही कॅप मिळाली आहे. केकेआर विरुद्धच्या सामन्यात डु प्लेसी फ्लॉप ठरला. पण पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
We’ve all got that first win feeling. ??
Have a great Thursday, 12th Man Army! ??@imVkohli @faf1307#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/8y9nCptFlK
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 31, 2022
मागच्या सीजनमध्ये कोणाला मिळाली होती?
मागच्या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाड सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप मिळवली होती. त्यावेळी ऋतुराजने CSK मधील आपला सहकारी फाफ डु प्लेसीपेक्षा दोन धावा जास्त करुन ही ऑरेंज कॅप मिळवली होती. फाफने 633 तर ऋतुराजने 635 धावा केल्या होत्या. सध्या चालू सीजनमध्ये फाफ डु प्लेसीने पंजाब किंग्स विरुद्ध सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. दोन सामन्यात मिळून त्याने 93 धावा केल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
पर्पल कॅपचा मानकरी कोण?
फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. कालपर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव आघाडीवर होता. पण कालच्या KKR विरुद्ध CSK सामन्यानंतर यामध्ये बदल झाला आहे.