IPL 2022: Mumbai Indians च्या चुकीचा KKR उचलणार फायदा! 9 मॅचमध्ये 30 विकेट घेणाऱ्या खेळाडूचा डेब्यु
IPL 2022: अनुकूल रॉय 2018 सालच्या अंडर 19 वर्ल्ड कप संघातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने सहा सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या.
मुंबई: IPL 2022 मध्ये कोलकातासाठी आता प्रत्येक सामना ‘करो या मरो’ आहे. प्रत्येक पराभव कोलकाताला प्लेऑफपासून दूर घेऊन जाणारा आहे. त्यामुळे कोलकाताची टीम काहीही करुन प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. ग्रुप स्टेजमध्येच कोलकाताला आपलं आव्हान संपवायचं नाहीय. कोलकाताने आता मुंबई इंडियन्सच्या चुकीचा फायदा उचलला आहे. आजच्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात केकेआरने एका ऑलराऊंडर खेळाडूला डेब्युची संधी दिली आहे. कधी हा खेळाडू मुंबई इंडियन्सच्या पलटनचा भाग होता. केकेआरकडून आज डेब्यु करणाऱ्या या प्लेयरचं नाव आहे, (Anukul Roy) अनुकूल रॉय.
अंडर 19 वर्ल्ड कप मधील विकेटटेकर
अनुकूल रॉय 2018 सालच्या अंडर 19 वर्ल्ड कप संघातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने सहा सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या. 2019 साली मुंबई इंडियन्सकडून त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध डेब्यु केला होता. त्यावेळी या ऑलराऊंडरला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पण त्याने 11 धावा देऊन एक विकेट घेतला होता. अनुकूल बिहारच्या समस्तीपुरचा रहाणारा आहे. रवींद्र जाडेजाला तो आपला आदर्श मानतो. प्रेमाने लोक त्याला समस्तीपुरचा रवींद्र जाडेजा म्हणतात.
अनुकूलला वेंकटेशच्या जागी संधी
IPL 2022 मध्ये त्याने आज कोलकाता नाइट रायडर्ससाठी डेब्यु केलाय. KKR फ्रेंचायजीने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये त्याला विकत घेतलय. आज वेंकटेश अय्यरच्या जागेवर त्याला संधी मिळाली आहे.
Waiting for something cool because it’s time for @anukul06roy in ?&? #KKRHaiTaiyaar #KKRvRR #IPL2022 pic.twitter.com/nRiJqJ0Vx5
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 2, 2022
रणजीच्या डेब्यु सीजनमध्ये 9 सामन्यात 30 विकेटस
अनुकूल रॉय बिहारच्या समस्तीपुरशी संबंधित असला, तरी तो क्रिकेट मात्र झारखंडकडून खेळतो. त्याने 2017-18 मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून झारखंडसाठी लिस्ट ए मधून डेब्यु केला होता. त्यानंतर पुढच्याचवर्षी 2018-19 मध्ये रणजी स्पर्धेत खेळला होता. आपल्या पहिल्याच रणजी सीजनमध्ये त्याने 9 सामन्यात 30 विकेटस काढल्या होत्या.