IPL 2022 सुरु होण्याआधीच मोठा वाद, आयपीएल संघमालक BCCI वर भडकले, वादाचं कारण काय?

IPL 2022: इंडियन प्रिमियर लीगचा 15 वा हंगाम (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. सर्वच टीम्सनी आपली प्रॅक्टीस सुरु केली आहे. चेन्नई सुपरकिंग्सने सूरतमध्ये ट्रेनिंग सुरु केली आहे.

IPL 2022 सुरु होण्याआधीच मोठा वाद, आयपीएल संघमालक BCCI वर भडकले, वादाचं कारण काय?
टीम इंडिया Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 11:40 AM

मुंबई: इंडियन प्रिमियर लीगचा 15 वा हंगाम (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. सर्वच टीम्सनी आपली प्रॅक्टीस सुरु केली आहे. चेन्नई सुपरकिंग्सने सूरतमध्ये ट्रेनिंग सुरु केली आहे. पण मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच एका नवीन वादाने जन्म घेतला आहे. टीम इंडियाच्या प्रॅक्टीस कॅम्पमुळे(Team India Practice Camp) आयपीएल संघ नाराज झाल्याची माहिती आहे. आयपीएल 2022 आधी टीम इंडियाचा कॅम्प आयोजित करणं, हे बीसीसीआय बरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन आहे, असं फ्रेंचायजींचं मत आहे. टीम इंडियाचे सर्वच मोठे खेळाडू 15 मार्चपर्यंत बंगळुरु एनसीएमध्ये (NCA) रहाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्यादिवशी ते आपल्या संघाच्या कॅम्पमध्ये दाखल होतील. हे खेळाडू तीन दिवस क्वारंटाइनमध्येही रहाणार आहेत.

आयपीएल फ्रेंचायजींसाठी वाईट बातमी

मोठे खेळाडू 19 किंवा 20 मार्चपर्यंत कॅम्पमध्ये दाखल होतील. आयपीएल फ्रेंचायजींसाठी ही वाईट बातमी आहे. मोठे खेळाडू उशिराने दाखल झाल्यास आयपीएल फ्रेंचायजींचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण त्या संघांनी जाहीरात कंपन्यांबरोबर करार केला आहे. खेळाडू उशिराने आले, तर जाहीरातीचे चित्रीकरण कधी करायचे? हा प्रश्न आहे. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.

नाराजीची दोन कारणं

IPL टीम्स नाराज होण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत. सर्व फ्रेंचायजीना आपल्या स्पॉन्सर सोबत झालेला करार निभावायचा आहे. खेळाडू उशिराने आयपीएल बबलमध्ये दाखल झाले, तर स्पॉन्सर्ससोबत जाहीरातींचे शूट कसे करायचे? दुसरी गोष्ट म्हणजे सर्वच टीम्सना आपल्या मोठ्या खेळाडूंना कोविड 19 पासून वाचवायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व खेळाडू आयपीएल बायोबबलमध्ये आले पाहिजेत.

आता त्यांचा फायदा झाला पाहिजे, पण

मागच्या दोन सीजनपासून आयपीएल स्पर्धा परदेशात होत होती. आमच्या प्रायोजकांच नुकसान झालं आहे. तरीही ते आमच्यासोबत आहेत. आता त्यांचा फायदा झाला पाहिजे. पण खेळाडू कुठे आहेत? ते कॅम्पमध्ये आहेत, असं एका फ्रेंचायजीच्या प्रमोटरने सांगितलं. बीसीसीआयने आपल्या सर्वच कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या व विना कॉन्ट्रॅक्टच्या खेळाडूंना 10 दिवसांच्या फिटनेस कॅम्पमध्ये सहभागी होण्यास सांगितलं आहे. हा कॅम्प 15 मार्चपर्यंत चालणार आहे. एकूण 25 खेळाडू या कॅम्पचा भाग आहेत.

संबंधित बातम्या: IND vs SL: कुलदीप यादव न खेळताच टीम इंडियाच्या बाहेर, ‘या’ खेळाडूचा संघात समावेश IPL 2022: वानखेडेसह अन्य स्टेडियम्सवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला कितपत फायदा मिळणार? क्रिकेट एक्सपर्ट म्हणतात… Shane Warne Death: शेन वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, मृतदेहाजवळ ती महिला कोण होती?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.