GT vs PBKS IPL 2022: टॉस जिंकून सगळे बॉलिंग घेतात, तू बॅटिंग का घेतली? पराभवावर Hardik Pandya ने दिलं उत्तर

GT vs PBKS IPL 2022: प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सच्या टीमने आठ विकेटवर 143 धावाच केल्या. पंजाबने 16 षटकात दोन विकेट गमावून हे आव्हान पार केलं.

GT vs PBKS IPL 2022: टॉस जिंकून सगळे बॉलिंग घेतात, तू बॅटिंग का घेतली? पराभवावर Hardik Pandya ने दिलं उत्तर
हार्दिक पंड्याImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 3:09 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतला गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) हा पहिलाच सीजन आहे. पण आपल्या पहिल्याच मोसमात या टीमने दुसऱ्या संघांची डोकेदुखी वाढवून ठेवलीय. आयपीएलमध्ये (IPL 2022) या टीमने आतापर्यंत 10 सामने खेळले असून आठ मॅचेस जिंकल्या आहेत. फक्त दोन सामन्यात पराभव झालाय. मंगळवारी पंजाब किंग्सकडून (Punjab kings) या संघाचा दुसरा पराभव झाला. पंजाबने मोठ्या फरकाने गुजरातला नमवलं. या मॅचमध्ये गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरंतर या सीजनमध्ये टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेतो. हाच आतापर्यंतचा या सीजनमधला ट्रेंड राहिला आहे. सर्वच संघांनी लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. कालच्या सामन्यात हार्दिक पंड्याने उलट केलं. त्याने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. त्या निर्णयावर हार्दिकने आता स्पष्टीकरण दिलय.

किती धावसंख्या आव्हानात्मक ठरली असती?

अवघड परिस्थिती टीम कशी परफॉर्म करते, त्याची चाचपणी करण्यासाठी टॉस जिंकल्यानंतर पहिली फलंदाजी घेतली, असं हार्दिक म्हणाला. या पीचवर 170 पर्यंत धावसंख्या आव्हानात्मक ठरली असती. पण विकेट गमावल्यामुळे एवढी धावसंख्या करणं शक्य झालं नाही. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सच्या टीमने आठ विकेटवर 143 धावाच केल्या. पंजाबने 16 षटकात दोन विकेट गमावून हे आव्हान पार केलं. शिखर धवनने नाबाद 62, भानुका राजपक्षे 40 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 30 धावा केल्या.

हार्दिककडून पराभवाचं विश्लेषण

सामना संपल्यानंतर हार्दिकने पराभवाचं विश्लेषण केलं. “आम्ही इथे आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकलो नाही. या पीचवर 170 एक आदर्श धावसंख्या ठरली असती. पण आम्ही विकेट गमावल्या. आम्हाला सूर गवसला नाही. मी प्रथम फलंदाजी स्वीकरण्याच्या माझ्या निर्णयाच समर्थन करतो, कारण आम्हाला कठीण परिस्थितीत टीम कशी परफॉर्म करते, ते पहायचं होतं. म्हणूनच फलंदाजीचा निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करताना आम्ही चांगले खेळतोय. पण प्रथम फलंदाजीची करण्याची वेळ आली, तर तिथेही खेळता आलं पाहिजे” असं हार्दिक म्हणाला.

‘या पराभवातून धडा मिळालाय’

‘या पराभवातून आम्हाला धडा मिळालाय’ असं हार्दिक म्हणाला. “आम्हाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. पण या पराभवातून मी शिकलो. आम्हाला आमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारावी लागेल” असं हार्दिकने सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.