IPL मध्ये भल्या-भल्यांचा जितका पगार नाही, तितका पैसा Jos buttler ने फक्त अवॉर्ड्समधून कमावला

jos buttler ipl 2022: लीग स्टेजच्या सुरुवातीला जोस बटलरने दमदार खेळ दाखवला. मधल्या टप्प्यात त्याचा सूर हरवला होता. पण मोसमाच्या अखेरीस प्लेऑफमध्ये त्याने जोरदार कमबॅक केलं.

IPL मध्ये भल्या-भल्यांचा जितका पगार नाही, तितका पैसा Jos buttler ने फक्त अवॉर्ड्समधून कमावला
जोस बटलर ऑरेंज कॅपमध्ये पहिल्या स्थानी कायमImage Credit source: rr twitter
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 3:10 PM

मुंबई: इंग्लंडच्या जोस बटलरने IPL 2022 चा सीजन गाजवला. राजस्थान रॉयल्सने त्याला रिटेन केलं होतं. बटलरने या सीजनमध्ये कमालीची फलंदाजी केली. त्याने यंदाच्या सीजनमध्ये काही रेकॉर्ड मोडले, तर काही रेकॉर्डसशी बरोबरी केली. जोस बटलरने (Jos buttler) या सीजनमध्ये चार शतक झळकावली. 17 सामन्यात त्याने 863 धावा फटकावल्या. चार अर्धशतकही त्याने फटकावली. एका सीजनमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. एकाच सीजनमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीची (Virat Kohli) बरोबरी केली. जोस बटलरमुळेच राजस्थान रॉयल्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. बटलरने या सीजनमध्ये जसा धावांचा पाऊस पाडला, तसाच त्याच्यावर पैशांचाही पाऊस पडला. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये जोस बटलरने एकूण 37 पुरस्कार जिंकले. एकाच सीजनमध्ये एखाद्या खेळाडूने मिळवलेले हे सर्वात जास्त पुरस्कार आहेत.

लीग स्टेजच्या सुरुवातीला जोस बटलरने दमदार खेळ दाखवला. मधल्या टप्प्यात त्याचा सूर हरवला होता. पण मोसमाच्या अखेरीस प्लेऑफमध्ये त्याने जोरदार कमबॅक केलं. बटलरने या सीजनमध्ये तीन वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकला. लीग स्टेजमध्ये त्याला यासाठी प्रत्येकी 1-1 लाख रुपये मिळाले. क्वालिफायरमध्ये त्याला याच पुरस्काराचे पाच लाख रुपये मिळाले. म्हणजे प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्कारातून बटलरने कमालवे 8 लाख रुपये.

पावर प्लेयर अवॉर्ड

लीग स्टेजमध्ये चार वेळा त्याला पावर प्लेयरचा अवॉर्ड दिला गेला. क्वालिफायर 2 मध्ये सुद्धा त्याने हा पुरस्कार मिळवला होता. एकूण मिळून पाच वेळा तो हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला. प्रत्येक वेळी 1 लाख म्हणजे त्याने या पुरस्कारातून 5 लाखाची कमाई केली. मोसमाच्या अखेरी पावर प्लेय़र सीजन म्हणूनही त्याची निवड झाली. त्याची रक्कम 10 लाख रुपये होती. अशा प्रकारे त्याने 15 लाखाची कमाई केली.

हे सुद्धा वाचा

गेम चेंजर पुरस्कार

लीग स्टेज मध्ये त्याला चार वेळा गेम चेंजरचा अवॉर्ड मिळाला. दोन वेळा प्लेऑफमध्ये हा अवॉर्ड मिळवला. म्हणजे एकूण सहा वेळा त्याने हा पुरस्कार जिंकला. त्याने यातून 6 लाखाची कमाई केली. गेम चेंजर ऑफ द सीजनचा पुरस्कारही त्याला मिळाला. त्यासाठी त्याला 10 लाख रुपये मिळाले. एकूण 16 लाख रुपये यातून कमावले. दोन वेळा सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच म्हणून निवड झाली. त्यावेळी प्रत्येकी एक-एक लाख रुपये मिळाले. यातून 2 लाखाची कमाई केली.

आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक चौकार-षटकार

बटलरने सात वेळा एका सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा पुरस्कार मिळवला आहे. प्रत्येक सामन्यासाठी त्याला लाखभर रुपये मिळाले. सर्वाधिक चौकार मारण्याच्या पुरस्कारासाठी 10 लाख मिळाले. म्हणजे एकूण 17 लाखांची कमाई केली. पाचवेळा सर्वाधिक सिक्स मारण्यासाठी दिला जाणारा पुरस्कार मिळाला. त्यातून 5 लाखाची कमाई केली. एकाच सीजनमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्यासाठी 10 लाख रुपये मिळाले. म्हणजे ती कमाई झाली 15 लाख रुपये.

मोस्ट वेल्यूएबल प्लेयर

तीन वेळा तो मोस्ट वेल्यूएबल खेळाडू म्हणून निवडला गेला. त्या पुरस्काराने प्रत्येकी 3 लाख मिळाले. या सीजनमधला मोस्ट वेल्यूएबल खेळाडूच्या पुरस्कारासाठी 10 लाख रुपये मिळाले. एकूण 13 लाखाची कमाई त्याने केली. ऑरेंज कॅपसाठी 10 लाख मिळाले. या सीजनमधली बटलरची अतिरिक्त कमाई आहे 96 लाख रुपये. जोस बटलरने अवॉर्डमधून जितका पैसा कमावलाय, तितकी तर आयपीएलमध्ये काही खेळाडूंची सॅलरी सुद्धा नाहीय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.