IPL 2022: सकाळी दिल्ली कॅपिटल्सला हरवण्याचा संदेश मिळाला, Tim David चा मोठा खुलासा
IPL 2022: फाफ डू प्लेसिसने टिम डेविडला काय मेसेज पाठवला होता, ते जाणून घेण्याआआधी डेविड जी इनिंग खेळला, त्यावर एक नजर मारुया.
मुंबई: IPL 2022 मध्ये Mumbai Indians ची सुरुवात भले आठ पराभवांनी झाली असेल, पण शेवट मात्र विजयाने झाला. विजय पण असा मिळवला, ज्याच्यामुळे कोणाचं तरी भलं झालं. मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली. मुंबई-दिल्ली सामन्यात मुंबईच्या कामगिरीवर RCB चा पुढचा प्रवास अंवलबून होता. दिल्लीचा संघ या पराभवामुळे प्लेऑफच्या बाहेर गेला. दिल्ली विरुद्ध मुंबईच्या विजयाचा हिरो टिम डेविड आहे. डेविडने 11 चेंडूत 34 धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर झाला. सामन्यानंतर टिम डेविडने खुलासा केला की, “RCB चा कॅप्टन फाफ डू प्लेसिसकडून सकाळी एक मेसेज मिळाला होता”
फाफ डू प्लेसिसने टिम डेविडला काय मेसेज पाठवला होता, ते जाणून घेण्याआआधी डेविड जी इनिंग खेळला, त्यावर एक नजर मारुया. खातं उघडलं नव्हतं, तेव्हाच डेविट आऊट झाला होता. पण ऋषभ पंतने DRS चा ऑप्शन वापरला नाही. या जीवदानाचा फायदा उठवत डेविडने मुंबईच्या टीमला विजयाच्या दारापर्यंत नेऊन ठेवलं.
300 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी
टिम डेविडने त्या जीवदानाचा फायदा उचलत 300 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. तो 11 चेंडूत 34 धावांची स्फोटक खेळी खेळून गेला. यात दोन चौकार आणि चार षटकार होते. 18 वं षटक संपत असताना टिम डेविड आऊट झाला. पण तो पर्यंत त्याने आपलं काम चोख बजावून ठेवलं होतं. काल सकाळीच फाफ डू प्लेसिसने डेविडला मेसेज पाठवला होता.
डू प्लेसिसच्या मेसेजमध्ये काय होतं?
फाफ डू प्लेसिसने डेविडला काय मेसेज पाठवला होता, त्या बद्दल जरा जाणून घेऊया. फाफने डेविडला मेजेस पाठवलेला “त्यात तो, ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली मुंबई इंडियन्सच्या किटमध्ये होता. याचाच अर्थ RCB चा मुंबईला इंडियन्सला फुल सपोर्ट् होता. टिम डेविड याआधी RCB कडून खेळला आहे.