IPL 2022: Mumbai Indians ने लीगच्या मध्यावर एका नव्या खेळाडूला केलं साइन, आता तरी जिंकणार?
IPL 2022 Mumbai Indians: तो खेळाडू मोहम्मद अरशदचं स्थान घेणार आहे. अरशद खानला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो संपूर्ण सीजनसाठी बाहेर गेला आहे.
मुंबई: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम यंदाच्या सीजनमध्ये खूपच खराब प्रदर्शन करतेय. पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवणारा हाच का तो संघ? असा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना पडला आहे. रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सलग आठ सामन्यात पराभव झाला आहे. मुंबई आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईच्या टीमने विजयासाठी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. नवीन खेळाडूंना संधी देऊन पाहिली. पण अजून मुंबईचा एकही प्रयोग यशस्वी ठरलेला नाही. संघाच्या खराब प्रदर्शनामुळे मुंबईची टीम एखाद्या नव्या खेळाडूचा संघात समावेश करेल, अशी चर्चा होती. मुंबई इंडियन्सने अखेर मध्य प्रदेशच्या कुमार कार्तिकेय सिंहला (Kumar kartikeya singh) संघात स्थान दिलं आहे. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी 24 वर्षाच्या कार्तिकेय सिंहला संघात स्थान दिल्याची घोषणा केली.
कुमार कार्तिकेय सिंह कोणाचं स्थान घेणार?
20 लाख रुपयाच्या बेस प्राइसमध्ये मुंबई इंडियन्सने या खेळाडूला विकत घेतलं आहे. कार्तिकेय टीममध्ये मोहम्मद अरशदचं स्थान घेणार आहे. अरशद खानला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो संपूर्ण सीजनसाठी बाहेर गेला आहे.
कुमार कार्तिकेय सिंह कुठल्या राज्याकडून खेळतो?
कुमार कार्तिकेय यंदा सपोर्ट टीमचा भाग होता. नेट्समध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने टीम मॅनेजमेंटला प्रभावित केलं. त्यामुळे त्याला संघात स्थान दिलं. कार्तिकेयने आपल्या गोलंदाजीत खूपच सुधारणा केली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय 20 लाख रुपयात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. कुमार कार्तिकेय मागच्या चार वर्षांपासून मध्य प्रदेशच्या संघाचा भाग आहे. त्याने मध्य प्रदेशसाठी 9 फर्स्ट क्लास सामन्यात 35, 19 लिस्ट ए च्या सामन्यात 18 आणि आठ टी 20 सामन्यात 9 विकेट घेतल्यात.
From being a support player to now being drafted into the first team! ?
Welcome to #OneFamily, Kartikeya ?#DilKholKe #MumbaiIndians @Kartike54075753 https://t.co/KYSVibKHfl
— Mumbai Indians (@mipaltan) April 28, 2022
अखेर रोहित शर्माचं टि्वट?
मुंबईच्या इंडियन्सच्या खराब प्रदर्शनावर कॅप्टन रोहित शर्माने दोन दिवसांपूर्वी टि्वट केलं होतं. “या स्पर्धेत आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करु शकलेलो नाही. पण असं कधी कधी घडतं. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांना अशा स्थितीतून जावं लागतं. पण माझं मुंबई इंडियन्सवर आणि इथल्या वातावरणावर प्रेम आहे. आमच्या हिंतचितकांचे मी आभार मानतो. या परिस्थितीतही ते संघासोबत आहेत” असं रोहितने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.