LSG vs RCB IPL 2022: मुंबईमुळे प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या RCB चा विजय, लखनौचा खेळ संपला

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (LSG vs RCB) एक रोमांचक सामना पहायला मिळाला. एलिमिनेटरच्या या महत्त्वाच्या सामन्यात RCB ने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवला.

LSG vs RCB IPL 2022: मुंबईमुळे प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या RCB चा विजय, लखनौचा खेळ संपला
LSG vs RCB
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 12:40 AM

मुंबई: लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (LSG vs RCB) एक रोमांचक सामना पहायला मिळाला. एलिमिनेटरच्या या महत्त्वाच्या सामन्यात RCB ने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवला. बँगलोरने विजयासाठी 208 धावांचं लक्ष्य दिलं होतं. लखनौ सुपर जायंट्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये सहा बाद 193 धावा केल्या. लखनौकडून के.एल. राहुलने (KL Rahul) कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. त्याने 58 चेंडूत 79 धावा केल्या. यात तीन चौकार आणि पाच षटकार होते. राहुल खेळपट्टीवर असे पर्यंत लखनौच्या विजयाची आशा वाटत होती. पण 19 व्या षटकात जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर राहुलने शाहबाज अहमदकडे झेल दिला. पाठोपाठ पुढच्याच चेंडूवर कृणाल पंड्या शुन्यावर आऊट झाला. त्याने हेझलवूडकडेच झेल दिला. 19 व्या षटकातील या दोन विकेटसमुळे सामन्याचं पारड आरसीबीच्या बाजूने झुकलं. शेवटच्या षटकात हर्षल पटेलने आपलं काम चोख बजावलं. केएल राहुलला दीपक हुड्डाने चांगली साथ दिली. त्याने 26 चेंडूत 45 धावा फटकावल्या. यात एक चौकार आणि चार षटकार आहेत. दीपक हुड्डाला वानिंन्दु हसरंगाने क्लीन बोल्ड केलं.

RCB ला आता राजस्थानशी लढावं लागेल

या पराभवामुळे लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या बँगलोरला आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ काल गुजरात टायटन्सकडून पराभूत झाला होता.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

रजत पाटीदार विजयाचा नायक

रजत पाटीदार आरसीबीच्या विजयाचा नायक आहे. त्याच्यामुळेच आरसीबीला हा सामना जिंकता आला. रजत पाटीदारने आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शानदार शतक झळकावलं. एलिमिनेटरच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना झाला त्याने लखनौच्या गोलंदाजांनी जोरदार धुलाई केली. अक्षरक्ष: त्याने आणि दिनेश कार्तिकने लखनौच्या गोलंदाजांना कुट, कुट, कुटलं. दोघांनी इडन गार्डन्सवर आज चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रजत पाटीदारने 49 चेंडूत आयपीएल आणि टी 20 करीयरमधील पहिलं शतक झळकावलं.

दिनेश कार्तिकची स्फोटक खेळी

रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिकच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर RCB ने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये चार बाद 207 धावा केल्या. रजत पाटीदारने 54 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 7 सिक्स होते. दिनेश कार्तिकने आपल्या नेहमीच्या स्टाइलनमध्ये 23 चेंडूत 37 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार आहे. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.