DC vs KKR, IPL 2022 Toss Update: दिल्लीने टॉस जिंकला, आज तीन खेळाडूंचा डेब्यू
DC vs KKR, IPL 2022: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (DC vs KKR) मध्ये सामना होत आहे.
DC vs KKR, IPL 2022: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (DC vs KKR) मध्ये सामना होत आहे. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh pant) टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांची या सीजनमध्ये फार चांगली स्थिती नाहीय. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi capitals) सात पैकी तीन सामने जिंकलेत, चार मॅचेसमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तेच कोलकाताना आठ पैकी पाच सामने गमावलेत. तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. प्लेऑफची शर्यत लक्षात घेता, आजच्या सामन्यात विजय मिळवणं, दोघांसाठी महत्त्वाचं आहे.
केकेआरच्या टीममध्ये तीन बदल
कोलकाताच्या टीममध्ये आज एकूण तीन बदल करण्यात आले आहेत. बाबा इंद्रजीत आणि हर्षित राणा आज कोलकात्याकडून डेब्यु करत आहेत. एरॉन फिंचही संघात परतला आहे. वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावीला बाहेर बसवण्यात आलं आहे.
दिल्लीच्या संघ दोन बदल
दिल्लीच्या टीममध्ये आज दोन बदल करण्यात आले आहेत. सर्फराझ खान आणि खलील अहमदला बाहेर बसवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर मिचेल मार्श आणि चेतन सकारिया खेळणार आहे. चेतन सकारिया आज दिल्लीकडून डेब्यू करतोय.
TOSS UPDATE!
Rishabh has won the toss and we’re going to bowl first ?#DCvKKR
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
दिल्ली कॅपिटल्स Playing – 11 ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, रोव्हमॅन पॉवेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफीझूर रहमान, चेतन साकारीया,
केकेआर Playing – 11 श्रेयस अय्यर (कॅप्टन), एरॉन फिंच, सुनील नरेन, नितीश राणा, वेंकटेश अय्यर, बी. इंद्रजीत, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, उमेश यादव, टीम साउदी, हर्षित राणा,