IPL 2022 स्टेडियममध्ये मॅच दरम्यान कपलचा ‘किसींग’ सीन, ‘माझा देश बदलतोय, पुढे जातोय’

IPL 2022: सध्या क्रीडा क्षेत्रात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा (IPL) उत्साह आहे. क्रिकेट फॅन्स एकापेक्षा एक सरस, रोमांचक क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहेत. यंदाचा आयपीएलचा 15 वा हंगाम आहे.

IPL 2022 स्टेडियममध्ये मॅच दरम्यान कपलचा 'किसींग' सीन, 'माझा देश बदलतोय, पुढे जातोय'
आयपीएल 2022 दरम्यान कॅमेऱ्यात कैद झालेला एक क्षण Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 5:34 PM

पुणे: सध्या क्रीडा क्षेत्रात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा (IPL) उत्साह आहे. क्रिकेट फॅन्स एकापेक्षा एक सरस, रोमांचक क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहेत. यंदाचा आयपीएलचा 15 वा हंगाम आहे. मुंबई आणि पुण्यात आयपीएलचे सामने सुरु आहेत. टी 20 क्रिकेटकडे वेग, मनोरंजन आणि ग्लॅमर म्हणून पाहिलं जातं. सध्या या तिन्ही गोष्टी स्टेडियममध्ये पहायला मिळत आहेत. फलंदाजांच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे. त्याचवेळी स्टेडियममधले ग्लॅमरस चेहरे लक्ष वेधून घेत आहेत. काल गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (GT vs DC) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर (Pune Mca Stadium) आयपीएलमधला 10 वा सामना पार पडला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यात पहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्सने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती.

स्टेडियममधली प्रेक्षक गॅलरी

एकवेळ दिल्ली कॅपिटल्स हा सामना जिंकणार असं वाटत होतं, पण मोहम्मद शमी, राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीला 157 धावाच करता आल्या. गुजरातने 14 धावांनी आयपीएलमध्ये सलग दुसरा सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समधील लढत आणखी एका वेगळ्या कारणासाठी सुद्धा चर्चेत आली. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षक गॅलरीत बसलेले एक कपल किसींग करताना दिसले.

या फोटोवर आपली क्रिएटीव्हीटी दाखवली

उपस्थित कॅमेरामनने लगेच तो फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल व्हायला फार वेळ लागला नाही. नेटीझन्सनी लगेच या फोटोवर आपली क्रिएटीव्हीटी दाखवली. सोशल मीडियावर गमतीशीर मीम्सचा जणू पूरच आला होता.

मिस्ट्री गर्ल व्हायरल

आयपीएल सामन्यांच्यावेळी कॅमेरामन मैदानावरील घटनांसह स्टेडियममधील लक्षवेधी गोष्टीसुद्धा आपल्या कॅमेऱ्यात पकडण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एखाद्या सुंदर तरुणीचा फोटो सुद्धा व्हायरल होतो. आतापर्यंत मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली आहे. आता किसींग करणारं कपल कॅमेऱ्यात कैद झालं आहे. किसींग करणाऱ्या कपलवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

‘माझा देश बदलतोय, पुढे जातोय’

‘हे कपल आयपीएल मॅचला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलं’, असं एका युजरने लिहिलं आहे. ‘माझा देश बदलतोय, पुढे जातोय’, असं दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात चौथ षटक संपल्यानंतर किसींग करतानाचा हा फोटो आहे. त्यावेळी दिल्लीच्या एक विकेट गमावून 32 धावा झाल्या होत्या. पृथ्वी शॉ आणि मनदीप सिंह क्रीजवर होता. दिल्लीच्या टीमने नऊ विकेट गमावून 157 धावा केल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.