IPL 2022 Mega Auction: लिलावाची तारीख ठरली, बंगळुरुत ‘या’ दिवशी जमणार संघ मालक

नव्या संघांसाठी रिटेंशनची तारीख 25 डिसेंबर होती. पण आता ही मर्यादा वाढवण्यात येईल. अजूनपर्यंत अहमदाबाद फ्रेंचायजीचं लेटर ऑफ इटेंट सीवीस कॅपिटलला मिळालेलं नाही.

IPL 2022 Mega Auction: लिलावाची तारीख ठरली, बंगळुरुत ‘या’ दिवशी जमणार संघ मालक
ipl
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 6:16 PM

बंगळुरु: आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction)तारीख जाहीर झाली आहे. दोन दिवस ही लिलाव प्रक्रिया चालणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला लिलाव होईल. बंगळुरुमध्ये हा लिलाव आयोजित केला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा लिलाव असेल. या मेगा ऑक्शनसाठी खेळाडूंची यादी जानेवारीपर्यंत निश्चित केली जाईल. आयपीएल 2022 मध्ये लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. या संघांना जास्तीत-जास्त तीन खेळाडू रिटेन करण्याचा अधिकार मिळाला आहे. मेगा ऑक्शन आधी हे रिटेंशन होणार आहे.

नव्या संघांसाठी रिटेंशनची तारीख 25 डिसेंबर होती. पण आता ही मर्यादा वाढवण्यात येईल. अजूनपर्यंत अहमदाबाद फ्रेंचायजीचं लेटर ऑफ इटेंट सीवीस कॅपिटलला मिळालेलं नाही. सीवीसी कॅपिटल बेटिंग कंपनीसोबतच्या लिंकच्या चर्चेमुळे वादात सापडली होती. बीसीसीआयला कायदेशीर सल्ला घ्यावा लागला होता. बीसीसीआय अधिकृतरित्या लवकरच सीवीसी कॅपिटलला अहमदाबाद संघाचा मालकी हक्क देईल.

लखनऊ या दुसऱ्या नव्या फ्रेंचाजयी बाबत कुठलाही वाद नाहीय. त्यांनी आपले मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, सहाय्यक कोच विजय दहिया आणि मार्गदर्शक गौतम गंभीर निश्चित केले आहेत. केएल राहुल लखनऊ संघाकडून खेळेल अशी चर्चा आहे. आयपीएलमध्ये आधीपासून असलेल्या आठ संघांनी 30 नोव्हेंबरला रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव दिली होती. ऑक्शनच्याआधी सर्व संघांना 90 कोटी रुपयांचे पर्स दिले आहे. खेळाडूंना रिटेन केल्यानंतर पर्समधून पैसे वजा होतात. त्यानंतर पर्समध्ये उरलेल्या रक्केमतूनच मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर बोली लावली जाते.

संबंधित बातम्या:

IPL 2022: ब्रायन लारा आणि डेल स्टेनने IPL मधील ‘या’ संघाच्या प्रशिक्षकपदाची स्वीकारली जबाबदारी धक्कादायक! मुंबईत एका डावात 10 विकेट घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडने वगळलं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास विलंब शुल्क माफी, परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.