MI vs KKR kieron pollard: पोलार्ड तात्या अजूनही तितकाच डेंजरस, पाच बॉलमध्ये दाखवून दिलं

MI vs KKR kieron pollard: कायरन पोलार्ड (kieron pollard) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हुकूमी एक्का आहे. पण त्याच्या फॉर्मवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

MI vs KKR kieron pollard: पोलार्ड तात्या अजूनही तितकाच डेंजरस, पाच बॉलमध्ये दाखवून दिलं
IPL 2022: मुंबई इंडियन्स कायरन पोलार्डImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 10:55 PM

मुंबई: कायरन पोलार्ड (kieron pollard) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हुकूमी एक्का आहे. पण त्याच्या फॉर्मवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कारण राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने गोलंदाजी आणि फलंदाजीत निराश केलं होतं. सामना रोमांचक स्थितीमध्ये असेल किंवा हाणामारीच्या षटकात पोलार्ड म्हणजे चौकार-षटकाराची हमखास गॅरेंटी. पण राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तो जुना पोलार्ड दिसला नव्हता. त्याचं पोट पाहून फिटनेसबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. आता तो पोलार्ड राहिला नाही, असं मुंबई इंडियन्सच्या काही फॅन्सच मत आहे. पण आज कायरन पोलार्डन अजूनही आपण संपलो नसल्याचं दाखवून दिलं. त्याने केकेआरकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सची गोलंदाजी झोडून काढली. त्याने पॅट कमिन्सच्या शेवटच्या षटकात 23 धावा वसूल केल्या. कमिन्सच्या 20 वी ओव्हर टाकत होता. पोलार्डने पहिल्या चेंडूवर सिक्स मारला. त्यानंतर शेवटचे दोन चेंडूही त्याने प्रेक्षक गॅलरीत पाठवले. पोलार्डने पाच चेंडूत 22 धावा केल्या.

सूर्यकुमार-तिलक वर्मा जोडी जमली

मुंबई इंडियन्सला धावफलकावर 161 ही सन्मानजनक धावसंख्या पाहता आली, ती सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मामुळे. त्यांनी मुंबईचा अडचणीत असलेला डाव सावरला. सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. तिलक वर्माने 27 चेंडूत 38 धावा करुन चांगली साथ दिली. तिलकने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 83 धावांची भागीदारी केली. मुंबई इंडियन्सने 15 व्या षटकानंतर फलंदाजीचा गियर बदलला. शेवटच्या पाच षटकात मुंबई इंडियन्सने 75 धावा वसूल केल्या. त्याआधी मुंबई इंडियन्सने सावध फलंदाजी केली.

बेबी एबीच्या बॅटिंगमध्ये धावांची भूक

रोहित शर्मा-इशान किशन आज अपेक्षित कामगिरी करु शकले नाहीत. इशानने आज 21 चेंडूत 14 धावा केल्या. रोहित तीन धावांवर आऊट झाला. दोघांनी खूपच सावध फलंदाजी केली. आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसच्या बॅटिंगमध्ये धावांची भूक दिसली. बेबी एबी म्हटल्या जाणाऱ्या ब्रेविसने 19 चेंडूत 29 धावा करताना दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.