Jasprit bumrah Mumbai Indians: बटलरची दांडी गुल करणारा जसप्रीत बुमराहचा ‘कडक’ यॉर्कर एकदा बघाच VIDEO
Jasprit bumrah Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन सुरु आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (Rajasthan royals vs Mumbai Indians) दिवसातील पहिला सामना झाला.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन सुरु आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (Rajasthan royals vs Mumbai Indians) दिवसातील पहिला सामना झाला. जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने हा सामना जिंकला. जोस बटलरने (Jos buttler) यंदाच्या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. जोस बटलरने आपल्या फलंदाजीने अनेकांची मन जिंकून घेतली. जसप्रीत बुमराहने सुद्धा आज सुंदर गोलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) निराशाजनक गोलंदाजी केली होती. त्याची गोलंदाजी स्वैर वाटली होती. टप्पा भरकटल्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांनी बुमराहच्या गोलंदाजीवर सहज धावा वसूल केल्या होत्या. जागतिक क्रिकेटमध्ये आज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा दबदबा आहे. तशी कामगिरी पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहकडून झाली नव्हती. पण आज बुमराहने ती कसर भरुन काढली.
आज नावाला जागला
जसप्रीत बुमराहने आज अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. नव्या चेंडूने बुमराहने जबरदस्त बॉलिंग केली. स्वत:च्या दुसऱ्या षटकात यशस्वी जैस्वालची विकेट मिळवली. त्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना त्याने अप्रतिम यॉर्कर चेंडू दाखवले. यॉर्कर हे जसप्रीत बुमराहच्या भात्यातील प्रमुख अस्त्र आहे. आज राजस्थानचा शतकवीर जोस बटलरल त्याची झलक पहायला मिळाली.
19 व्या षटकात बुमराहने दिले दणके
बुमराहने जोस बटलर शतकाच्याजवळ असताना यॉर्कर चेंडूंचा मारा केला. बटलर 100 धावा पूर्ण झाल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या एका अप्रतिम यॉर्कर चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. 19 व्या षटकात बुमहारने हेटमायर आणि बटलरची विकेट मिळवली. त्याने चार षटकात 17 धावा देत तीन विकेट काढल्या. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध जसप्रीत बुमराहने 3.3 षटकात 43 धावा दिल्या होत्या.
Bang on Target? Cricket at its finest?#MIvRR #Buttler #Bumrah pic.twitter.com/6b4nn81nCI
— Kushagra? (@not_kushaagra) April 2, 2022
हीच कमला बुमराहने आधी दाखवली असती तर….
जसप्रीत बुमराहच्या या यॉर्कर चेंडूने आधी कमाल दाखवली असती, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा दिसला असता. जसप्रीत बुमराह राजस्थानच्या संघावर भारी पडला. पण मुंबईचे अन्य गोलंदाज तितके प्रभावी ठरले नाहीत. बासिल थम्पीच्या एका षटकात जोस बटलरने 26 धावा लुटल्या. मुरुगन अश्विन, कायरन पोलार्डने प्रतिषटक दहापेक्षा जास्त धावा दिल्या.