IPL 2022: डोळे भरुन आलेल्या रोहितच्या बायकोला अश्विनच्या पत्नीने दिला आधार, पहा मैदानात काय घडलं, VIDEO
IPL 2022: रोहितच्या प्रत्येक मॅचच्यावेळी पत्नी रितिका सजदेह स्टेडियममध्ये त्याला चिअरअप करण्यासाठी उपस्थित असते. कालही रोहित आऊट झाला, त्यावेळी रितिका सजदेह प्रेक्षक स्टँडमध्ये उपस्थित होती.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग मध्ये काल बऱ्याच कालावधीनंतर विराट कोहलीला (Virat kohli) सूर गवसला. त्याने तब्बल 14 सामन्यानंतर काल आयपीएलमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. विराटच्या या अर्धशतकी खेळीनंतर चाहत्यांचे टीम इंडियातील दुसरा स्टार फलंदाज रोहित शर्माकडे (Rohit sharma) लक्ष लागले होते. रोहितचा शनिवारी बर्थ डे होता. रोहित आज मॅचविनिंग खेळी करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण असं घडलं नाही. रोहितला चाहत्यांच्या आणि टीमच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. तो अवघ्या 2 रन्सवर आऊट झाला. रविचंद्रन अश्विनने (Ravi chandran Ashwin) त्याची विकेट घेतली. रोहित यंदाच्या आयपीएलमध्ये संघर्ष करताना दिसतोय. त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीयत. कालही हाच सिलसिला कायम राहिला. तो पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्याच्या अशा पद्धतीने आऊट होणं, त्याच्या पत्नीला भरपूर लागलं.
तिचा चेहरा लगेच उतरला
रोहितच्या प्रत्येक मॅचच्यावेळी पत्नी रितिका सजदेह स्टेडियममध्ये त्याला चिअरअप करण्यासाठी उपस्थित असते. कालही रोहित आऊट झाला, त्यावेळी रितिका सजदेह प्रेक्षक स्टँडमध्ये उपस्थित होती. अश्विनच्या गोलंदाजीवर रोहित आऊट झाल्यानंतर तिला आपली निराशा लपवता आली नाही. तिचा चेहरा लगेच उतरला. हे सर्व घडलं, त्यावेळी अश्विनची पत्नी प्रितीही तिथे उपस्थित होती.
प्रिती तिथे होती, तिने काय केलं?
नवऱ्याने मुंबई इंडियन्सची महत्त्वाची विकेट काढल्यामुळे तिने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. अश्विननेही मैदानावर सेलिब्रेशन केले. रोहित निराश होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने परतत होता, त्यावेळी रितिका खूपच निराश झाली होती. प्रीती लगेच तिच्याजवळ गेली. तिला मिठी मारुन तिचं सांत्वन केलं. आयपीएलमध्ये मोठ्या खेळाडूंना पैसा भरपूर मिळतो. पण त्याचवेळी त्यांच्यावर दबावदेखील तितकाच असतो. रितिका, अनुष्का असो किंवा अन्य क्रिकेटपटूची पत्नी. मनाने त्या सुद्धा क्रिकेटशी तितक्या एकरुप झालेल्या असतात.
Com’on ASh ? pic.twitter.com/3k7hyS3XsJ
— Krishna Tiwari (@krishnaa_ti) April 30, 2022
रोहितचा काल वाढदिवस होता. त्याने वयाच्या 35 व्या वर्षात पदार्पण केलं. रोहित काल फ्लॉप ठरला. पण मुंबई इंडियन्सचा संघ जिंकला. रोहितच्या बर्थ डे च्या दिवशी मुंबई इंडियन्सने विजयी गिफ्ट दिलं.