MS Dhoni Quits CSK Captaincy: असा आहे धोनीचा IPL ट्रॅक रेकॉर्ड, किती विजय, किती पराभव, जाणून घ्या सर्व डिटेल्स
बहुचर्चित आयपीएल (IPL) स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधीच महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच कर्णधारपद सोडलं. सर्वांनाच हा हैराण करुन सोडणार निर्णय आहे.
मुंबई: बहुचर्चित आयपीएल (IPL) स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधीच महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच कर्णधारपद सोडलं. सर्वांनाच हा हैराण करुन सोडणार निर्णय आहे. CSK ने टि्वटरवरुन धोनीने कर्णधारपद सोडल्याच्या निर्णयाची माहिती दिली. धोनीच्या जागी रवींद्र जाडेजा आयपीएलचा कॅप्टन झाला आहे. धोनी आयपीएलच्या पहिल्या सीजनपासून चेन्नईचा कॅप्टन आहे. धोनीने या टीमला सहा वेळा चॅम्पियन बनवलं. धोनीने रवींद्र जाडेजाकडे सीएसकेची कॅप्टनशिप सोपवली आहे. जाडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सीएसकचे नेतृत्व करणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या टीमला एक ओळख मिळवून दिली. धोनीने CSK मध्ये अनेक क्रिकेटपटूंना घडवलं. जाणून घेऊया धोनीचा कॅप्टन म्हणून रेकॉर्ड.
- एमएस धोनीने आयपीएलच्या 204 सामन्यात कर्णधारपद भूषवलं. त्यात 121 सामने चेन्नईने जिंकले, तर 82 सामन्यात पराभव झाला. कॅप्टन म्हणून धोनीच्या विजयाची टक्केवारी 59.60 आहे.
- धोनीच्या नेतृत्वाखाली 11 वेळा चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि नऊ वेळा फायनलमध्ये पोहोचला. त्यात चार वेळा आय़पीएलच जेतेपद पटकावलं.
- महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलं. दोन वेळा चॅम्पियन्स लीगमध्येही धोनीने चेन्नईला विजेतेपद मिळवून दिलं.
- चेन्नईच कर्णधारपद सोडल्यानंतर 2007 नंतर पहिल्यांदाच धोनी कॅप्टनशिपशिवाय खेळताना दिसणार आहे.
- कॅप्टन म्हणून धोनीने टीम इंडियाला वर्ल्ड कप, टी 20 वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवून दिलं.
Non Stop LIVE Update