IPL 2022: धोनी महाराष्ट्राच्या मुलाला देतोय षटकार मारण्याचं खास ट्रेनिंग, हा मुलगा आयपीएल गाजवू शकतो, पहा VIDEO

IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. क्रिकेट चाहते आतुरतेने आयपीएलची वाट पहात आहेत.15 व्या सीजनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) रंगणार आहे.

IPL 2022: धोनी महाराष्ट्राच्या मुलाला देतोय षटकार मारण्याचं खास ट्रेनिंग, हा मुलगा आयपीएल गाजवू शकतो, पहा VIDEO
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 7:03 AM

IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. क्रिकेट चाहते आतुरतेने आयपीएलची वाट पहात आहेत.15 व्या सीजनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) रंगणार आहे. धोनीचा संघ सलामीच्या सामन्यासह संपूर्ण सीजनसाठी कसून सराव करतोय. चेन्नईचा प्रॅक्टिस कॅम्प सूरतमध्ये सुरु आहे. तिथे धोनीसह (MS dhoni) रॉबिन उथप्पा आणि अन्य खेळाडू मैदानावर घाम गाळतायत. धोनी स्वत: नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करतोय. त्याशिवाय धोनी एका खास खेळाडूला आयपीएल 2022 साठी तयार करतोय. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये CSK ने अंडर 19 वर्ल्डकप मधील स्टार राजवर्धन हंगरगेकरचा आपल्या ताफ्यात समावेश करुन घेतला होता. राजवर्धन ऑलराऊंडर खेळाडू आहे. धोनी सध्या याच राजवर्धनवर मेहनत घेत आहे. धोनी त्याचा मार्गदर्शक बनला आहे.

वय चोरीचा झाला आरोप

एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो राजवर्धनला हिटिंगची ट्रेनिंग देताना दिसत आहे. धोनीने राजवर्धनला बॅटच्या स्विंगवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. शॉट खेळल्यानंतर बॅट कुठपर्यंत गेली पाहिजे, ते सुद्धा धोनीने त्याला सांगितलं. याला बॅट फॉलोथ्रू सुद्धा म्हणतात. व्हिडिओमध्ये धोनी आधी त्याला बॅट स्विंगबद्दल सांगतो. त्यानंतर हा युवा फलंदाज त्याच अंदाजात शॉट खेळतो. राजवर्धन हंगरगेकर मूळचा महाराष्ट्राचा उस्मानाबादचा खेळाडू आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यासाठी त्याच्यावर वय चोरीचाही आरोप झाला आहे.

राजवर्धन चेन्नई सुपर किंग्सचं मुख्य अस्त्र बनणार

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये राजवर्धनने दमदार प्रदर्शन केलं. आयपीएल मेगा ऑक्शन 2022 मध्ये त्याची निवड झाली. त्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये चुरस दिसली. पण अखेर चेन्नईने 1.50 कोटी रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतलं.

राजवर्धनची बेस प्राइस 30 लाख रुपये होती. राजवर्धन प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. तो 140 किमी प्रति तास या वेगाने गोलंदाजी करु शकतो. त्याशिवाय लोअर ऑर्डरमध्ये हिटिंग करण्याचीही त्याची क्षमता आहे. हा खेळाडू CSK साठी मोक्याच्याक्षणी उपयुक्त ठरु शकतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.