IPL 2022: Rohit Sharma ची बॅट चालणार त्या दिवशी Mumbai Indians जिंकणार
IPL 2022: मुंबई इंडियन्सच (Mumbai Indians) नशीब खराब आहे. या लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाला आहे.
मुंबई: मुंबई इंडियन्सच (Mumbai Indians) नशीब खराब आहे. या लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाला आहे. बुधवारी पंजाब किंग्स (Punjab kings) विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या सीजनमध्ये लीगमध्ये एकूण 10 टीम्स खेळतायत. मुंबईच्या टीमचा प्लेऑफचा मार्गही खडतर आहे. एकदम सरस दर्जाचा खेळ केला, तर मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. याआधी खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक केलं आहे. पण यावेळी आव्हान सोपं नाहीय. कॅप्टन रोहित शर्मासाठी (Rohit sharma) हा एक झटका आहे. रोहित शर्मा आता टीम इंडियाचाही कॅप्टन आहे. या लीगमध्ये टीमची कामगिरी घसरल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचीही चिंता वाढते. मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे पाचही सामने गमावले आहे. त्याची टीमच्या फॅन्सना सर्वात जास्त चिंता आहे.
मुंबई इंडियन्सच्या पराभवामध्ये मोठं अंतर
मुंबई इंडियन्सने 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिला सामना खेळला होता. या मॅचमध्ये 10 चेंडू राखून चार विकेटने त्यांचा पराभव झाला. राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 23 धावांनी हरवलं. कोलकाता नाइट रायडर्सने तर चार ओव्हर राखून मोठा विजय मिळवला. आरसीबीने मुंबईला सात विकेटने हरवलं. त्यावेळी नऊ चेंडू बाकी होते. पंजाब किंग्स विरुद्ध सामना रोमांचक बनू शकला असता, पण मोक्याच्या क्षणी रनआऊट झाल्यामुळे पंजाबचं काम सोप झालं. 12 धावांनी मुंबईचा पराभव झाला. वरील पाच पैकी एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाबरोबर मुंबई इंडियन्सचा अटी-तटीचा संघर्ष दिसला नाही.
रोहित शर्मा पराभवाचं एक कारण
रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमधील धोकादायक फलंदाज आहे. लीगमधला तो एक यशस्वी कॅप्टनही आहे. टीमला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. पण या सीजनमध्ये रोहित शर्मा आपली जबाबदारी निभावण्यात अपयशी ठरला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यात त्याने फक्त 108 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 21.60 आणि स्ट्राइक रेट 133.33 आहे. मुंबईच्या टीमला सीजनमधले अजून नऊ सामने खेळायचे आहेत. या नऊ सामन्यातील जय-पराजयामुळे फार फरक पडणार नाही. त्याशिवाय मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.