IPL 2022: Mumbai Indians ला झटका, दुखापतीमुळे एक गोलंदाज OUT, 21 वर्षाच्या स्फोटक फलंदाजाला केलं साईन
IPL 2022: त्याचा आयपीएलमधला हा दुसरा टप्पा होता. याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळलाय. काही सीजन तो बाहेरही होता. मिल्ससाठी सुद्धा यंदाच्या आयपीएलमधली त्याची कामगिरी लक्षात ठेवण्यासारखी नाहीय.
मुंबई: Mumbai Indians चा संघ सलग दुसऱ्यावर्षी आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने सर्वात खराब प्रदर्शन केलं आहे. अवघ्या 9 सामन्यात मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. आता फक्त प्रतिष्ठा राखण्यासाठी मुंबई इंडियन्सला उर्वरित सामने खेळायचे आहेत. मुंबई पुढेच सामने जिंकण्याचा आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेल. पण त्यांना एक झटका लागला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स (Tymal mills) दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीय. मिल्सच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. दुखापत आणि खराब प्रदर्शनामुळे मागच्या काही सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. आधीच मुंबईची गोलंदाजी प्रभावहीन असताना मुंबई इंडियन्सने आणखी एका फलंदाजाचा संघात समावेश केला आहे. आक्रमक खेळासाठी हा फलंदाज ओळखला जातो.
कशी होती मिल्सची कामगिरी?
हा सीजन सुरु होण्याआधी मेगा ऑक्शन पार पडलं. त्यात इंग्लंडच्या टायमल मिल्सला मुंबई इंडियन्सने 1.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्याचा आयपीएलमधला हा दुसरा टप्पा होता. याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळलाय. काही सीजन तो बाहेरही होता. मिल्ससाठी सुद्धा यंदाच्या आयपीएलमधली त्याची कामगिरी लक्षात ठेवण्यासारखी नाहीय. त्याला पाच सामन्यात संधी मिळाली. पण कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला सलग सामने खेळता आले नाहीत. त्याने फक्त 6 विकेट घेतले व 11 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या.
Squad Update: Tristan Stubbs to replace Tymal Mills in #MumbaiIndians 2022 squad.#OneFamily #DilKholKe pic.twitter.com/kwSkrpvMct
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022
कोण आहे ट्रिस्टस स्टब्स?
मुंबईच्या संघाकडे आधीच चांगल्या गोलंदाजांची कमतरता आहे. त्यात मिल्सच्या बाहेर होण्याने आणखी एक पर्याय कमी झाला आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली नाहीय. तिथेही चांगल्या प्रदर्शनाचा अभाव आहे. मुंबई इंडियन्सने आता टायमल मिल्सच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज ट्रिस्टस स्टब्सला करारबद्ध केलं आहे. मिल्सच्या दुखापतीमुळे त्याच्याजागी उर्वरित सामन्यांसाठी ट्रिस्टस स्टब्सचा संघात समावेश करण्यात आल्याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली आहे. 21 वर्षाच्या या युवा फलंदाजाने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेच्या ‘अ’ संघाकडून डेब्यु केला होता. दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केलीय. T 20 क्रिकेटमध्येही तो चांगलं प्रदर्शन करतो.