IPL 2022: मलिंगावर Mumbai Indians नाराज? टीमकडून 48.22 कोटी कमावणाऱ्या लसिथने असं काय केलं?

IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची सुरुवात 2008 साली झाली. राजस्थान रॉयल्सच्या टीमचे क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकारा यांनी या विषयावर वेगळीच गोष्ट सांगितली.

IPL 2022: मलिंगावर Mumbai Indians नाराज? टीमकडून 48.22 कोटी कमावणाऱ्या लसिथने असं काय केलं?
IPL 2022: Mumbai Indians Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 4:45 PM

IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची सुरुवात 2008 साली झाली. लसिथ मलिंगा (Lasith Malinga) अगदी पहिल्या मोसमापासून मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळला. तब्बल 13 वर्ष निवृत्त होईपर्यंत लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. मुंबई इंडियन्स बरोबर मलिंगाचं एक अतूट नातं होतं. पण आता ही साथ सुटली आहे. श्रीलंकेचा हा माजी वेगवान गोलंदाज दुसऱ्या संघाशी करारबद्ध झाला आहे. आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी त्याची निवड झाली आहे. लसिथ मलिंगाने त्याच्या करीयरचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे. पण मुंबई इंडियन्सचे मॅनेजमेंट मलिंगाच्या या निर्णयावर नाराज असल्याची माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार मलिंगाच्या या निर्णयाचं मुंबई इंडियन्सला आश्चर्य वाटलं असून ते निराश झाले आहेत.

इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, लसिथ मलिंगाचा हा निर्णय मुंबई इंडियन्सला पटलेला नाही. राजस्थान रॉयल्सच्या टीमचे क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकारा यांनी या विषयावर वेगळीच गोष्ट सांगितली. लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्सचा कोच झाल्यामुळे मुंबई इंडियन्सचे कोच माहेला जयवर्धने यांना आनंद झाला आहे, असें कुमार संगकारा यांनी सांगितलं.

मलिंगावर काय बोलले संगकारा?

“मला असं वाटतं की, माहेला जयवर्धने आनंदी आहेत. मलिंगाला राजस्थान रॉयल्सने संधी दिली आहे. मलिंगाला आपल्या कोचिंग स्टाफमध्ये घेण्याची मुंबई इंडियन्सचा इच्छा होती. पण त्यांच्या कोचिंग युनिटमध्ये जागा नव्हती. राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजांना लसिथ मलिंगाचं मार्गदर्शन मिळणार, यामुळे आम्ही नशिबवान आहोत” असे संगकारा म्हणाले.

मलिंगाला मुंबईने भरपूर काही दिलं

लसिथ मलिंगा 2008 पासून मुंबई इंइियन्सशी संबंधित आहे. आयपीएल 2020 त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली. रिपोर्टनुसार मलिंगाने 12 वर्षात मुंबई इंडियन्सकडून 48.22 कोटी रुपये कमावले. नव्या रोलमध्ये लसिथ मलिंगाला राजस्थान रॉयल्सच्या बॉलिंग युनिटला अवघड परिस्थितीसाठी तयार करण्याची जबाबदारी असेल. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यात लसिथ मलिंगा माहीर आहे. आयपीएलमधील तो एक यशस्वी गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या कोचिंगचा राजस्थान रॉयल्सचा नक्कीच फायदा होईल.

मलिंगा राजस्थान रॉयल्सशी का करारबद्ध झाला?

लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्सशी करारबद्ध होण्यामागे वेगवेगळी कारण आहेत. सर्वप्रथम संगकारा आणि मलिंगा मागच्या 15 वर्षांपासून परस्परांना ओळखतात. दोघे श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघातून एकत्र खेळले आहेत.

संगकाराच्या नेतृत्वाखाली खेळताना मलिंगा एक वेगवान गोलंदाज म्हणून अधिक विकसित झाला. मुंबई इंडियन्सकडे शेन बॉन्ड आणि झहीर खानसारखे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे मलिंगाला मुंबई इंडियन्समध्ये सहजासहजी स्थान मिळणार नव्हते. त्यामुळे अखेर त्याने राजस्थान रॉयल्सचा पर्याय निवडला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.