MI vs DC Kuldeep Yadav: पुरेशी संधी न देताच घरी पाठवलेल्या कुलदीपने आज ‘संपला’ बोलणाऱ्यांची तोंड केली बंद

MI vs DC Kuldeep Yadav: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Mumbai Indian vs Delhi Capitals) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना सुरु आहे.

MI vs DC Kuldeep Yadav: पुरेशी संधी न देताच घरी पाठवलेल्या कुलदीपने आज 'संपला' बोलणाऱ्यांची तोंड केली बंद
कुलदीप यादव Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 6:05 PM

मुंबई: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Mumbai Indian vs Delhi Capitals) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना सुरु आहे. आयपीएलचा हा पंधरावा सीझन आहे. दोन्ही टीम्सचा हा पहिला सामना आहे. आजच्या सामन्यात पहिल्याडावात दोन खेळाडूंनी आपली वेगळी छाप उमटवली. सर्वप्रथम इशान किशनच्या (Ishan Kishan) खेळाचं कौतुक कराव लागेल. त्याने 48 चेंडूत नाबाद 81 धावांची खेळी केली. यात 11 चौकार आणि दोन षटकार होते. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सुपर्ब परफॉमन्स दिला. त्याचं कौतुक करावं तेवढ कमी आहे. कारण ज्या कुलदीपला टीम इंडियात पुरेशी संधी मिळाली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी घरी पाठवून दिलं. त्याने आज आपल्या चायनामन गोलंदाजीची धार दाखवली.

कुलदीपने दाखवली जादू

कुलदीप यादवने मुंबईच्या धावगतीला लगामच घातला नाही, तर त्याने तीन महत्त्वाच्या विकेटही घेतल्या. याच कुलदीप यादवची आयपीएल स्पर्धा सुरु होण्याआधी वेस्ट इंइिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झाली होती. पण त्याला पुरेशी संधीच दिली नाही. त्याला बेंचवर बसवून ठेवलं. अखेर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्याकसोटी आधी घरी पाठवून दिलं. त्याच कुलदीपने आज आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. कुलदीपने आच चार षटकात अवघ्या 18 धावा देत तीन विकेट घेतल्या.

त्याने धावांचा वेग कमी केला आणि…

मुंबईची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि इशान किशन दिल्लीच्या वेगवान गोलंदाजीवर सहजतेने धाव जमवत होते. त्यावेळी ऋषभने कुलदीपला गोलंदाजीला आणलं. त्याने धावांचा वेग कमी केलाच. पण कॅप्टन रोहित शर्मा, कायरन पोलार्ड आणि अनमोलप्रीत सारख्या महत्त्वाच्या विकेट काढल्या.

जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कुलदीप यादवला बाहेर करण्यामागचं अजब उत्तर दिलं होतं. बंगळुरु कसोटीआधी पत्रकार परिषद झाली होती. त्यात त्याने सांगितलं की, कुलदीप यादव बऱ्याचकाळापासून बायोबबलमध्ये आहे. त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी रिलीज करण्यात आलं आहे.

कुलदीप यादव मोहाली कसोटीत टीम इंडियाचा भाग होता. पण त्याला बेंचवर बसवून ठेवण्यात आलं. अश्विन, जाडेजाशिवाय जयंत यादवला तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळवण्यात आलं. बंगळुरु कसोटीआधी त्याला स्क्वाडमधूनच बाहेर करण्यात आलं. त्याच्याजागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.