IPL 2022: पुढचे 48 तास CSK साठी खूप महत्त्वाचे, NCA कडून मिळणाऱ्या रिपोर्टवर पुढची बरीच गणितं अवलंबून

IPL 2022 CSK: आयपीएल (IPL) स्पर्धेला आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 26 मार्चपासून CSK विरुद्ध KKR सामन्याने आयपीएलचं बिगुल वाजणार आहे.

IPL 2022: पुढचे 48 तास CSK साठी खूप महत्त्वाचे, NCA कडून मिळणाऱ्या रिपोर्टवर पुढची बरीच गणितं अवलंबून
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 4:23 PM

IPL 2022 CSK: आयपीएल (IPL) स्पर्धेला आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 26 मार्चपासून CSK विरुद्ध KKR सामन्याने आयपीएलचं बिगुल वाजणार आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे आहेत. दीपक चाहरच्या दुखापतीबद्दल नॅशनल क्रिकेट एकडमीकडून एमएस धोनीच्या टीमला रिपोर्ट मिळणार आहे. या स्टेटस रिपोर्टवरुन दीपक चाहर यंदाच्या 15 व्या सीजनमध्ये खेळू शकणार की, नाही ते स्पष्ट होईल. “दीपक चाहरच्या दुखापतीच्या सद्य स्थितीबद्दल अजून आम्हाला NCA किंवा BCCI कडून काही समजलेलं नाही. या टप्प्यावर आम्ही अजून दीपक चाहरच्या जागी बदली खेळाडूचा विचार केलेला नाही. आयपीएलच्या पुढच्या स्टेजमध्ये तो खेळण्यासाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे” असं CSK चे सीईओ कासी विश्वनाथन यांनी इनसाइट स्पोर्टसला सांगितलं. चाहरच्या दुखापतीबद्दल एक-दोन दिवसात एनसीएकडून स्टेटस रिपोर्ट मिळेल असं सीएसकेच्या सीईओनी माहिती दिली.

कुठली दुखापत झाली?

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगमध्ये क्वाड्रिसेप्स टीयरची दुखापत झाली आहे. या दुखापतीमधून पूर्णपणे बरं होण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं. पण आता अशी कुठलीही शस्त्रक्रिया करुन घेण्याची आवश्यकता नाही, असं वृत्त काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.

किती कोटी मोजले?

दीपक चाहर सीएसकेचा महागडा खेळाडू आहे. त्याला तब्बल 14 कोटी रुपये मोजून मेगा ऑक्शनमध्ये सीएसकेन विकत घेतलं आहे, सीएसकेच्या रणनितीचा दीपक चाहर एक मुख्य भाग आहे. दीपक चाहर सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आठ आठवड्यांच्या रिहॅब म्हणजे पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाला आहे. तिथे लवकरात लवकर त्याला फिट करण्यासाठी ट्रेनर मेहनत घेत आहेत.

सीएसकेला दीपक चाहरकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्याच्यासाठी त्यांनी बराच पैसा मोजला आहे. पावरप्लेच्या षटकात विकेट काढण्याची दीपक चाहरची खासियत आहे. त्याशिवाय आपल्या बॅटनेही तो प्रतिस्पर्धी संघाला तडाखा देऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेची त्याची प्रचिती आली आहे.

MRI स्कॅननंतर दीपक चाहरवर शस्त्रक्रिया करावी लागेल, असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्डकप लक्षात घेता, दीपक चाहरलाही स्वत:ला शस्त्रक्रिया करुन घ्यायची नाहीय. दीपक चाहर बाबतच्या बातमीमुळे सीएसकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.