IPL 2022 CSK vs KKR: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्सची Playing XI

IPL 2022 CSK vs KKR: बहुचर्चित IPL स्पर्धेचं आज अखेर बिगुल वाजणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) पहिला सामना होत आहे.

IPL 2022 CSK vs KKR: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्सची Playing XI
IPL 2022 - चेन्नई सुपर किंग्स Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 1:44 PM

मुंबई: बहुचर्चित IPL स्पर्धेचं आज अखेर बिगुल वाजणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) पहिला सामना होत आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील एक फेव्हरेट संघ आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत चार विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई संघाला यंदाही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. यंदाचा आयपीएलचा पंधरावा सीजन आहे. मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोन दिवसआधीच सीएसकेमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. सीएसकेचा अव्वल खेळाडू महेंद्र सिंह धोनीने टीमची कॅप्टनशिप सोडली. त्याने रवींद्र जाडेजाकडे कॅप्टनशिप सोपवली आहे. धोनीच्या अचानक कॅप्टनशिप सोडण्याच्या निर्णयाने फॅन्सना चक्रावून सोडलं. चेन्नई सुपर किंग्सला यशस्वी संघ बनवण्यात धोनीचं मोठ योगदान आहे. त्याने आपल्या खेळाने आणि कॅप्टनशिपने चेन्नईला एक वेगळी ओळख मिळवून दिली.

जाडेजा समोर यशस्वी वारसा चालवण्याचं आव्हान

रवींद्र जाडेजाला आता हाच वारसा पुढे चालवायचा आहे. त्याच्यासाठी पुढचा प्रवास आव्हानात्मकच असेल. कारण त्याच्या निर्णयाची, जय-पराजयाची धोनीशी तुलना केली जाईल. मेगा ऑक्शनमुळे सर्वच फ्रेंचायजींना नव्याने संघ बांधणी करावी लागली आहे. चेन्नईकडे नवीन संघ असल्याने नव्या कॅप्टनला पहिल्या सीजनपासून कॅप्टनशिपचा अनुभव मिळाला पाहिजे, याच विचारातून धोनीने कॅप्टनशिप सोडली. कॅप्टनशिप सोडली असली, तरी एमएस धोनी खेळाडू म्हणून खेळत रहाणार आहे.

टॉप तीन खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार

सीएसकेचा संघ सातत्याने आयपीएलमध्ये यशस्वी होत राहिला, यामागे कारण आहे, त्यांची संस्कृती, खेळाडूंमधील आत्मविश्वास आणि धोनीचं कल्पक नेतृत्व. आज होणाऱ्या पहिल्या सामन्यात जाडेजाला आपल्या टॉप तीन खेळाडूंशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे. मोइन अली, दीपक चाहर आणि ड्वेन प्रिटोरियस हे ते तीन खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे धोनीला पर्यायी खेळाडू घेऊन खेळावे लागणार आहे.

दिलासा देणारी बाब

दरम्यान यात चेन्नईसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडचं फिट होणं. ऋतुराज गायकवाड पूर्णपणे फिट झाला असून तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. नव्याने चेन्नईच्या संघात घेण्यात आलेला डेवॉन कॉनवे त्याचा सलामीचा जोडीदार असणार आहे. सीएसकेच्या संघात नंबर तीन वर मोइन अलीच्या जागी रॉबिन उथाप्पा उतरेल.

असा असेल संभाव्य संघ

सलामीवीर – ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे

मधल्या फळीत – अंबाती रायडू, रॉबिन उथाप्पा आणि एमएस धोनी

ऑलराऊंडर – रवींद्र जाडेजा (कॅप्टन), शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो,

वेगवान गोलंदाज – राजवर्धन हंगरगेकर, अ‍ॅडम मिलने

आजच्या सामन्यासाठी चेन्नईचा संभाव्य संघ – ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अंबाती रायडू, रॉबिन उथाप्पा, एमएस धोनी, रवींद्र जाडेजा (कॅप्टन), शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, राजवर्धन हंगरगेकर, अ‍ॅडम मिलने

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.