IPL 2022 Points Table : आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची आगेकूच, तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी, जाणून घ्या

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये कालपर्यंतच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर काल झालेल्या पंजाब आणि दिल्लीच्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पुन्हा बदल झाला आहे.

IPL 2022 Points Table : आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची आगेकूच, तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी, जाणून घ्या
दिल्ली कॅपिटल्स Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 8:14 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये कालपर्यंतच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर काल झालेल्या पंजाब आणि दिल्लीच्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पुन्हा बदल झाला आहे. काल दिल्ली कॅपिटल्सने (DC) पंजाब किंग्सला (PBKS) सहज हरवलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी पंजाब किंग्सला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरने जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने नऊ विकेट राखून हा सामना जिंकला. वॉर्नर आणि शॉ ने वेगाने धावा जमवल्या. त्यामुळे 11 षटकातच दिल्लीने विजयी लक्ष्य गाठलं. दिल्लीने फक्त दोन पॉइंटच मिळवले नाहीत, तर त्यांच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. सहा सामन्यात त्यांचा हा तिसरा विजय आहे. पंजाबचा सात सामन्यातील चौथा पराभव आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची आगेकूच?

आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात पहिल्या स्थानी आहे. गुजरातने सहापैकी पाच सामने जिंकले आहे. तर एक सामना हरला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी आरसीबी आहे. आरसीबीने सातपैकी पाच सामने जिंकले आहे. तर दोन सामन्यात त्यांना अपयश आलंय. तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानने सहापैकी चार सामने जिंकले आहे. दोन सामन्यात राजस्थानला अपयश आलंय. चौथ्या स्थानी लखनौ आहे. लखनौने सातपैकी चार सामने जिंकले असून तीन सामन्यात त्यांना अपयश आलंय. पाचव्या स्थानी हैदराबाद आहे. या संघाने सहापैकी चार सामने जिंकले आहे. तर दोन सामन्यात या संघाला अपयश आलंय. तर कालच्या सामन्यानंतर दिल्लीचा सहा सामन्यात त्यांचा हा तिसरा विजय आहे. पंजाबचा सात सामन्यातील चौथा पराभव आहे.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची पिछेहाट

पहिली तीन षटक पंजाबने चांगली फलंदाजी केली. पण सलामीवीर शिखर धवन बाद झाला. त्यानंतर पंजाब किंग्सच्या डावाची सुरु झालेली घसरण. शेवटपर्यंत थांबली नाही. ललित यादवच्या फिरकी गोलंदाजीवर फटका खेळताना शिखर धवन बाद झाला. ऋषभ पंतने यष्टीपाठी जबरदस्त झेल घेतला. खरंतर ललितने टाकलेला चेंडू एवढा खास नव्हता. पण शिखर चुकीचा फटका खेळला. त्यानंतर कॅप्टन मयंक अग्रवाल पाठोपाठ तंबूत परतला. लियाम लिव्हिंगस्टोनकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण काल तो स्वस्तात बाद झाला. या सीजनमध्ये लिव्हिंगस्टोन जबरदस्त फलंदाजी करत आहे. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर दिल्ली कॉपिटल्सने पॉईंट्स टेबलमध्ये आगेकूच केली आहे.

इतर बातम्या 

Yavatmal : कुलरचा शॉक लागून चौथीत शिकणाऱ्या संकल्पचा जागीच मृत्यू! यवतमाळमधील दुर्दैवी घटना

IPL 2022 MI vs CSK Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 4 गोष्टी लक्षात ठेवा , नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.