AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 points table : राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी, IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

काल RR vs RCBमध्ये आपीएल 2022चा तेरावा सामना झाला. संजू सॅमसनच्या राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय मिळवला. यानंतरही पॉईंट्स टेबल्या यादीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022 points table : राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी, IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…
राजस्थानचा पराजय तरीही पॉईंट्सच्या टेबलमध्ये अव्वलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 7:06 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या तेराव्या सामन्यात RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं दिसतं होतं. पण अनुभव दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शाहबाज अहमदच्या साथीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. सामन्यात संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय (RR vs RCB) मिळवला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मंगळवारी एक रंगतदार सामना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते. पण दिनेश कार्तिकने आणि अहमदने सामन्याचं चित्र पालटलं. टी 20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली. टी 20 तुम्ही वेगवान सुरुवात करा किंवा धीमी. सामन्याचा नूर पालटण्यासाठी एक-दोन षटक पुरेशी असतात. तेच सामन्यात घडलं. तत्पूर्वी आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं हेतं. कालच्या RR vs RCB सामन्यानंतर पॉईंट्सच्या टेबलमध्ये बदल दिसून आला. विशेष म्हणजे राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी कायम आहे. तर RCB सहाव्या क्रमांकावर गेला असून त्याला चार पॉईंट्स मिळाले आहेत.

IPL पॉइंट्सच्या टेबलची स्थिती

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

RCB सहाव्या स्थानी

रविचंद्रन अश्विन टाकत असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने फटकेबाजी केली. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावत 21 धावा चोपल्या. तिथूनच सामन्याच चित्र बदललं. राजस्थानने निर्धारीत 20 षटकात 169 धावा फटकावल्या. हे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चार विकेट आणि पाच चेंडू राखून पार केलं. RCB ने हा सामना जिंकला तो, दिनेश कार्तिक नाबाद (44) आणि शाहबाज अहमद (45) यांच्या फलंदाजीमुळे.  त्यामुळे RCB पॉईंट्सच्या टेबलमध्ये टेबलमध्ये सहाव्या स्थानी आला आहे.

राजस्थान पराभवानंतरही अव्वल

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या तेराव्या सामन्यात राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय मिळवला. असं असलं तरी राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तर बँगलोर संघाने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

शेवटच्या चेंडूची चर्चा

सामन्यात बटलर आणि देवदत्तच्या जोडीची चर्चा राहिली. त्यामुळे ही जोडी फोडणं आवश्यक होतं. हर्षलने देवदत्त पडिक्कलला शेवटच्या चेंडूवर फसवलं. यात इंटरेस्टिग भाग म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त चेंडूवर देवदत्त पडिक्कल आऊट झाला. देवदत्त पडिक्कलला हर्षलने स्लोअर बाऊन्सर टाकला. ऑन फिल्ड अंपायरने तो चेंडू वाईड ठरवला. हा निर्णय हर्षल पटेलला पटला नाही. त्याच्या चेहऱ्यावर संतप्त भाव होते. अखेर त्याने टाकलेला षटकातील शेवटचा चेंडू फटकावताना देवदत्तने मारलेला फटका विराटने झेलला. विराटने ही जबरदस्त कॅच घेतली.

इतर बातम्या

IPL 2022, Orange Cap : इशानची सत्ता गेली, ऑरेंज कॅपवर आता ‘बटलर’राज, पर्पल कॅपच्या यादीतही बदल

06 April 2022 Panchang | 06 एप्रिल 2022, बुधवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

Health Care : उन्हात निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाशित पाणी प्या, वाचा फायदेच फायदे!

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.