IPL 2022: ‘माझी परिस्थिती माहित नसताना तुम्ही…’ Prithvi Shaw चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा (IPL) पहिला सामना खेळण्यापूर्वी पृथ्वी शॉ च्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पृथ्वी शॉ NCA मध्ये झालेल्या Yo-Yo टेस्टमध्ये फेल (Prithvi Shaw YO-YO Test) झाला.

IPL 2022: 'माझी परिस्थिती माहित नसताना तुम्ही...' Prithvi Shaw चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
पृथ्वी शॉ Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 5:27 PM

मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा (IPL) पहिला सामना खेळण्यापूर्वी पृथ्वी शॉ च्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पृथ्वी शॉ NCA मध्ये झालेल्या Yo-Yo टेस्टमध्ये फेल (Prithvi Shaw YO-YO Test) झाला. पृथ्वी शॉ ला यो-यो टेस्ट पास करण्यासाठी 16.5 गुण मिळवणं आवश्यक होतं. पण पृथ्वीला 15 पॉईंटसही मिळवता आले नाहीत. पृथ्वीसोबत यो-यो टेस्ट देणारा हार्दिक पंड्या (Hardik pandya) आरामात ही टेस्ट पास झाला. खरंतर पृथ्वीऐवजी हार्दिकच्या फिटनेसबद्दल अनेकांच्या मनात संशय होता. हार्दिकने यो-यो टेस्टमध्ये 17 पॉईंट मिळवले. हार्दिकने गोलंदाजी सुद्धा केली. त्याने 135 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली. पृथ्वी शॉ फेल होताच सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. त्याची खिल्ली उडवण्यात आली. आता पृथ्वीने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

…तर परिस्थिती हार्दिकसाठी बिकट झाली असती

पृथ्वीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली असून त्यात त्याने ट्रोलर्सना ‘तुम्ही तुमचं काम करा’ असं सुनावलं आहे. “माझी परिस्थिती माहित नसताना, तुम्ही माझ्याबद्दल मत बनवू नका. तुम्ही तुमचं काम करा” असं पृथ्वीने त्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. पृथ्वी शॉ यो-यो टेस्टमध्ये फेल झाला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. कारण तो बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग नाहीय. हार्दिक पंडया यो-यो टेस्टमध्ये फेल झाला असता, तर त्याच्यासाठी आयपीएलमध्ये खेळणं मुश्किल झालं असतं.

पृथ्वी शॉ यो-यो टेस्टमध्ये कसा फेल झाला?

पृथ्वी शॉ यो-यो टेस्टमध्ये फेल कसा झाला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पृथ्वी शॉ सलग तीन रणजी सामने खेळला, त्यामुळे तो थकला होता. शॉ या तिन्ही सामन्यादरम्यान बायो-बबलमध्ये होता. त्यामुळे यो-यो टेस्ट दरम्यान त्याला अडचण आली. पृथ्वी यो-यो टेस्टमध्ये फेल झाला असला, तरी सामना जिंकून देण्याची त्याची क्षमता सर्वांना माहित आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रेंचायजीला या बद्दल माहित आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वीसाठी 7.50 कोटी रुपयाची मोठी किंमत मोजून त्याला रिटेन केलं आहे.

पृथ्वी शॉ च करीयर

पृथ्वी शॉ च करीयर ज्या पद्धतीने सुरु झालं, ते पाहून जागतिक क्रिकेटमध्ये दीर्घकाळ हा खेळाडू राज्य करेल, असंच वाटलं होतं. पण फिटनेसचा मुद्दा त्याच्या प्रगतीच्या आड आला. मुंबईचा हा फलंदाज भारतीय संघाकडून पाच कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 42 पेक्षा जास्त सरासरीने 339 धावा केल्या आहेत.

वनडेमध्ये पृथ्वीने 31.5 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ ने 24.62 च्या सरासरीने 1305 धावा केल्या आहेत. शॉ चा स्ट्राइक रेट 150 च्या आसपास आहे. शालेय स्तरापासून पृथ्वी शॉ हे नाव मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.