IPL 2022: प्लेऑफची शर्यत रंगतदार स्थितीत असताना Delhi Capitals साठी एक चांगली बातमी

IPL 2022 मध्ये प्लेऑफची (Playoff) शर्यत खूपच रंगतदार झाली आहे. आता कुठलाही संघ सामना सहजतेने घेणार नाही. जिंकण्याच्या जिद्दीने मैदानात खेळेल.

IPL 2022: प्लेऑफची शर्यत रंगतदार स्थितीत असताना Delhi Capitals साठी एक चांगली बातमी
delhi capitals Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 1:07 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये प्लेऑफची (Playoff) शर्यत खूपच रंगतदार झाली आहे. आता कुठलाही संघ सामना सहजतेने घेणार नाही. जिंकण्याच्या जिद्दीने मैदानात खेळेल. दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची बऱ्यापैकी संधी आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी एक चांगली बातमी आहे. त्यांचा स्टार ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi shaw) ला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पृथ्वीला ताप आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. रविवारी पृथ्वीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पृथ्वी टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहोचला आहे. पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्ससाठी पंजाब किंग्स विरुद्ध पुढचा सामना खेळणार की, नाही, या बद्दल काहीच स्पष्टता नाहीय. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना सोमवारी होणार आहे. IPL 2022 मध्ये पृथ्वी शॉ ने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शेवटचा सामना 1 मे रोजी खेळला होता. त्यानंतर तो आजारी होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पृथ्वीवर दिल्लीच्या मेडिकल टिमच लक्ष

दिल्ली कॅपिटल्सने टि्वटरवरुन पृथ्वी शॉ ला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्याला टायफाइड झाला होता. पृथ्वी शॉ आता टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये आला आहे. दिल्ली संघाची मेडिकल टिम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीसाठी चांगली बाब काय?

पृथ्वी शॉ आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी नऊ सामने खेळला आहे. त्याने 28.78 च्या सरासरीने 259 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 61 होती. आजारपणामुळे तो दिल्ली कॅपिटल्ससाठी मागचे तीन सामने खेळला नाही. पॉइंटस टेबलमध्ये 12 गुणांसह दिल्ली सहाव्या स्थानावर आहे. त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत. दिल्लीचा रनरेट प्लसमध्ये आहे, ही त्यांच्यासाठी चांगली बाब आहे. पुढचे दोन सामने जिंकले, तर दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. पंजाब किंग्स विरुद्धचा सामना झाल्यानंतर दिल्लीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.