IPL 2022: Prithvi Shaw चं काय चुकलं? त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं? टेस्ट, T-20 संघातून पत्ता कट

या दोन्ही सीरीजसाठी वेगवेगळे संघ निवडण्यात आले आहेत. काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. काही नव्या खेळाडूंना संधी दिली आहे, तर काही खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलय.

IPL 2022: Prithvi Shaw चं काय चुकलं? त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं? टेस्ट, T-20 संघातून पत्ता कट
पृथ्वी शॉ Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 12:39 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सीजन संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय सीजनला सुरुवात होईल. सर्वप्रथम भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच T-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल. टी 20 मालिकेचे नेतृत्व केएल राहुलकडे तर कसोटीचे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आहे. या दोन्ही मालिकांसाठी काल बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली. या दोन्ही सीरीजसाठी वेगवेगळे संघ निवडण्यात आले आहेत. काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. काही नव्या खेळाडूंना संधी दिली आहे, तर काही खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलय. दुर्लक्ष करण्यात आलेल्या खेळाडूंपैकीच एक आहे पृथ्वी शॉ. (Prithvi Shaw)

निवड न झाल्याचं आश्चर्य

पृथ्वीला कसोटी किंवा टी 20 कुठल्याही संघात स्थान मिळालेलं नाही. पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. सध्या चालू असलेल्या आयपीएलमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलय. पण तरीही त्याला संधी मिळालेली नाही. अनेकांना पृथ्वी शॉ ची निवड न झाल्याचं आश्चर्य आहे.

पृथ्वीने या सीजनमध्ये किती धावा केल्या?

IPL 2022 बद्दल बोलायचं झाल्यास, पृथ्वी शॉ ने 10 सामन्यात 283 धावा केल्यात. त्याची फलंदाजीची सरासरी 30 आहे. आयपीएलच्या लीग स्टेजमधल्या शेवटच्या काही सामन्यांआधी त्याला टायफाइडची बाधा झाली. त्यामुळे त्याला खेळता आलं नाही.

शेवटचा कसोटी सामना कधी खेळला?

पृथ्वी शॉ 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉ संघाबाहेरच आहे. त्याच्याजागी शुभमन गिलला संधी मिळाली होती. त्याने चमकदार कामगिरी केली होती. वनडे आणि टी 20 बद्दल बोलायचं झाल्यास, पृथ्वी शॉ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा सिनियर संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळत होता.

पृथ्वी शॉ चं आंतरराष्ट्रीय करीयर

5 कसोटी, 339 धावा, 42.37 सरासरी 6 वनडे, 189 धावा, 31.50 सरासरी 1 टी 20 – शुन्य धावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.