IPL 2022, Purple cap: युजवेंद्र चहलची चिंता वाढली, मित्रच पर्पल कॅप हिसकावणार ?

IPL 2022, Purple cap: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने चार विकेटने विजय मिळवला. या सामन्यात 15 विकेट पडले. ज्या सामन्यात गोलंदाजांचं वर्चस्व पहायला मिळतं, त्या सामन्यात पर्पल कॅपच्या शर्यतीत बदलही दिसणही स्वाभाविक आहे.

IPL 2022, Purple cap: युजवेंद्र चहलची चिंता वाढली, मित्रच पर्पल कॅप हिसकावणार ?
आयपीएलच्या पर्पल कॅपमध्ये युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावरImage Credit source: Rajasthan Royals Twitter
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 9:25 AM

मुंबई: IPL 2022 स्पर्धेचा रोमांच प्रत्येक सामन्यानिशी वाढत चालला आहे. पर्पल (Purple cap) आणि ऑरेंज कॅपसाठीची स्पर्धा अधिक तीव्र होतेय. पहिलं स्थान कोणासाठीही कायमस्वरुपी नाहीय. प्रत्येक मॅच बरोबर दावेदार बदलत चालले आहेत. गुरुवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (DC vs KKR) सामना झाला. या सामन्यानंतर युजवेंद्र चहलची चिंता वाढली असेल. त्याच्या पर्पल कॅपला धोका निर्माण झाला आहे. चहलचाच सहकारी कुलदीप यादव त्याच्याजवळ पोहोचला आहे. मागच्या सामन्यातील वाद मागे सोडून दिल्ली कॅपिटल्सने काल केकेआरवर विजय मिळवला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने चार विकेटने विजय मिळवला. या सामन्यात 15 विकेट पडले. ज्या सामन्यात गोलंदाजांचं वर्चस्व पहायला मिळतं, त्या सामन्यात पर्पल कॅपच्या शर्यतीत बदलही दिसणही स्वाभाविक आहे.

कुलदीप यादवची झेप

केकेआरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 146 धावा केल्या. कोलकाताला इतक्या कमी धावसंख्येवर रोखण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तीन षटकात 14 धावा देत चार महत्त्वाच्या विकेट काढल्या. या चार विकेटसह कुलदीपच्या खात्यात एकूण 17 विकेट जमा झाल्या आहेत. सध्या पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे आहे. कुलदीप चहलपेक्षा फक्त एका विकेटने मागे आहे. कुलदीप शिवाय या मॅचमध्ये केकेआरच्या उमेश यादवनेही चांगली गोलंदाजी केली. दिल्लीच्या तीन विकेट घेऊन तो सुद्धा पर्पल कॅपसाठी टॉप 5 च्या शर्यतीत दाखल झाला आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

राजस्थान रॉयल्सच्या चहलचा दबदबा

राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल अजूनही पहिल्या स्थानावर आहे. चहलने आठ सामन्यात 18 विकेट घेतलेत. कुलदीप दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आठ सामन्यात 17 विकेट घेतल्यात. सनरायजर्स हैदराबादचा उमरान मलिक आणि टी. नटराजन यांनी सुद्धा आठ सामन्यात 15 विकेट घेतल्यात. ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. उमेश यादव नऊ सामन्यात 14 विकेट घेऊन पाचव्या स्थानावर आहे.

पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.