Rajasthan Royals Controversy: IPL सुरु व्हायच्या 24 तास आधी पहिला राडा, RR मध्ये आपसातच वाजलं, संजू सॅमसन का भडकला?

Rajasthan Royals Controversy: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये (IPL 2022) दरवर्षी दर्जेदार क्रिकेट पहायला मिळतं. पण अनेकदा वाद सुद्धा होतात. आयपीएल 2022 चा सीजन सुरु व्हायला 24 तासांपेक्षाही कमी वेळ राहिला आहे.

Rajasthan Royals Controversy: IPL सुरु व्हायच्या 24 तास आधी पहिला राडा, RR मध्ये आपसातच वाजलं, संजू सॅमसन का भडकला?
राजस्थान रॉयल्स कॅप्टन संजू सॅमसन Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 9:40 PM

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये (IPL 2022) दरवर्षी दर्जेदार क्रिकेट पहायला मिळतं. पण अनेकदा वाद सुद्धा होतात. आयपीएल 2022 चा सीजन सुरु व्हायला 24 तासांपेक्षाही कमी वेळ राहिला आहे. पण त्याआधी मोसमातील पहिला वाद समोर आला आहे. हा थेट स्पर्धेशी संबंधित वाद नाहीय. पण राजस्थान रॉयल्सचा अंतर्गत वाद आहे. राजस्थान रॉयल्सकडून काही दिवसांपूर्वी गमतीशीर पोस्ट शेअर करण्यात येत होत्या. त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा व्हायची. पण आता या गमती-जमतींनी वादाला जन्म दिला आहे. राजस्थानच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन संजू सॅमसनबद्दल (Sanju Samson) एक पोस्ट करण्यात आली होती. ही पोस्ट टीमच्या कॅप्टनला अजिबात आवडली नाही. संजू सॅमसनने जाहीरपणे त्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली. कॅप्टन नाराज झाल्यामुळे फ्रेंचायजींने सोशल मीडिया टीमलचा (Rajasthan Royals Sacks Social Media Team) बर्खास्त केलं.

सोशल मीडिया टीमने मोठी किंमत चुकवली

नवा सीजन सुरु होण्याआधी सर्वच टीम कसून सराव करत आहेत. राजस्थान रॉयल्सची टीम आपल्या चाहत्यांना अपडेट देण्यासाठी गमतीशीर मार्ग अवलंबत होती. सोशल मीडिया टीम खेळाडूंचे फोटो वेगवेगळ्या पद्धतीने एडिट करुन पोस्ट करत होती. फॅन्सना या पोस्ट आवडत होत्या. शुक्रवारी 25 मार्चला कॅप्टन संजू सॅमसनने आपल्या अशाच एडिट केलेल्या एका पोस्टवर आपत्ती प्रगट केली. कॅप्टनच्या नाराजीची सोशल मीडिया टीमला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

क्या खूब लगते हो?

रॉयल्सच्या सोशल मीडिया टीमने संजू सॅमसनचा एक फोटो पोस्ट केला होता. एडिटिंग अॅप्सचा वापर करुन त्याला महिलेच्या रुपात दाखवलं होतं. टीम बसमध्ये बसलेल्या संजू समॅसनच्या फोटोवर “क्या खूब लगते हो?” असं कॅप्शन देण्यात आलं होतं. ही मस्करी संजू सॅमसनला अजिबात आवडली नाही. त्याने रिटवीट करुन आपली नाराजी व्यक्त केली. राजस्थान रॉयल्सचा टॅग करुन “मित्रांनो असं करणं ठीक आहे. पण संघांनी प्रोफेशनल असलं पाहिजे” असा मेसेज लिहिला होता.

सोशल मीडिया टीमवर राग काढला संजू सॅमसन एवढ्यावरच थांबला नाही, त्याने राजस्थान रॉयल्सच अकाऊंट ‘अनफॉलो’ केलं. कॅप्टनची नाराजी जगजाहीर झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सने टि्वट लगेच डिलीट केलं. फ्रेंचायजी मॅनेजमेंटने सोशल मीडिया टीमवर राग काढला. आम्ही सोशल मीडिया टीमच बदलत आहोत, असे फ्रेंचायजीकडून सांगण्यात आले. आजची घटना लक्षात घेऊन, आम्ही सोशल मीडियासाठी नव्या पद्धतीचा अवंलब करु असं म्हटलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.