IPL 2022: Mumbai Indians च्या दिल्ली विरुद्धच्या सामन्याआधी Congrats ‘निता भाभी’चं टि्वट व्हायरल

IPL 2022: दिल्ली जिंकली, तर प्लेऑफमध्ये आणि हरली तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्लेऑफमध्ये दाखल होईल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं प्लेऑफमध्ये पोहोचणं, सर्वस्वी Mumbai Indians वर अवलंबून आहे.

IPL 2022: Mumbai Indians च्या दिल्ली विरुद्धच्या सामन्याआधी Congrats 'निता भाभी'चं टि्वट व्हायरल
vijay mallya-Nita ambani Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 1:42 PM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग IPL स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफ फेरीतील तीन संघ निश्चित झाले आहेत. चौथा टीम कुठली? ते आज ठरेल. दिल्ली जिंकली, तर प्लेऑफमध्ये आणि हरली तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्लेऑफमध्ये दाखल होईल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं प्लेऑफमध्ये पोहोचणं, सर्वस्वी Mumbai Indians वर अवलंबून आहे. आज वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना होणार आहे. दिल्लीसाठी हा सामना ‘करो या मरोच’ असेल. RCB च्या फॅन्सनी मुंबईच्या विजयासाठी आतापासूनच प्रार्थना सुरु केली आहे. मुंबई जिंकली, तर दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. दिल्लीने सामना जिंकला, तर त्यांचे 16 पॉइंट्स होतील. नेट रनरेट त्यांचा आरसीबीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे सहाजिकच प्लेऑफसाठी ते पात्र ठरतील.

Congrats ‘निता भाभी’

दिल्ली-मुंबई मध्ये होणाऱ्या सामन्याआधी फारर उद्योजक विजय मल्ल्याचं 10 वर्ष एक जुनं टि्वट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मल्ल्याने त्या टि्वटमध्ये मुंबई इंडियन्सच्या ऑक्शनच्या रणनितीचं कौतुक केलं होतं. माझ्या मते, ऑक्शनमध्ये चांगली खरेदी मुंबई इंडियन्सने केली. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. Congrats ‘निता भाभी’ असं त्यांनी त्या टि्वमध्ये म्हटलं होतं.

आरसीबीची नजर पहिल्या जेतेपदावर

आयपीएलच्या लोकप्रिय संघांमध्ये RCB ची गणना होते. पण त्यांना अजूनपर्यंत एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. ते तीन वेळा आयपीएल फायनलमध्ये जरुर पोहोचले. पण जिंकू शकले नाहीत. आरसीबीच्या टीममध्ये मोठी नावं असूनही 2017, 2019 मध्ये आरसीबीचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तळाला होता. 2020 च्या सीजनमध्ये टीम प्लेऑफमधेये पोहोचली, पण ते ट्रॉफी जिंकू शकले नाहीत. आता त्यांचं प्लेऑफमध्ये जाणं, मुंबई इंडियन्सवर अवलंबून आहे.

विराट कोहलीचा शानदार खेळ

गुजरात टायटन्स विरोधात गुरुवारी आरसीबीने 8 विकेट राखून चांगला विजय मिळवला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सने 20 षटकात पाच बाद 168 धावा केल्या. कॅप्टन हार्दिक पंड्याने 47 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 34 आणि ऋदिमान सहाने 31 धावांच योगदान दिलं. आरसीबीने 18.4 षटकात दोन विकेट गमावून 170 धावा केल्या. कोहलीने या सामन्यात 54 चेंडूत 73 धावा फटकावल्या. यात आठ चौकार आणि दोन षटकार होते. कोहलीच्या फलंदाजीमुळे RCB ने हा सामना जिंकला.

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.