RR vs RCB IPL 2022: Dinesh Karthik चं नशीब खराब! चेंडू पकडला, सुटला आणि RUNOUT, मोठा ड्रामा, हा VIDEO एकदा बघाच
RR vs RCB IPL 2022: विजयासाठी RCB ला अजून 72 धावांची आवश्यकता होती. तुम्ही म्हणाल इतक्या धावा हव्या असताना टर्निंग पॉइंट कसा काय?
मुंबई: क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूचं रनआऊट होणं, ही सामन्याचं निकाल बदलण्यासाठी पुरेस ठरतं. चांगला फलंदाज मोक्याच्या क्षणी रनआऊट झाला, तर ते जीवाला जास्त लागतं. काल राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RR vs RCB) सामन्याच्यावेळी असंच घडलं. RCB चा दिनेश कार्तिक अगदी निर्णायक क्षणी धावबाद झाला. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) साख्या खेळाडूचं रनआऊट होणं, आरसीबीला परवडणारं नाही. कारण त्याच्यामध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. सध्याच्या सीजनमध्ये दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बळावर बँगलोरने काही सामने जिंकले आहेत. असा कार्तिक काल संघाला गरज असताना धावबाद झाला. कदाचित कार्तिक खेळपट्टिवर टिकला असता, तर सामन्याचा निकाल बँगलोरच्या बाजूने लागला असता. राजस्थान रॉयल्सने काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा 29 धावांनी पराभव केला.
नशिब खराब असेल, तेव्हाच….
दिनेश कार्तिक काल खेळपट्टिवर ज्या पद्धतीने रनआऊट झाला, त्यामध्ये खूप नाट्य दडलं आहे. हा रनआऊट पाहिल्यानंतर कालच्या दिवसात दिनेशला नशिबाची साथ नव्हती, असंच म्हणावं लागेल. कारण नशिब खराब असेल, तेव्हाच अशा पद्धतीने विकेट जाऊ शकतो. दिनेश कार्तिकची काही चूक नव्हती, तर त्याला डगआउटमध्ये परतावं लागलं. RCB च्या डावात 13 व्या ओव्हरमध्ये हे सर्व घडलं.
हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला
राजस्थानकडून फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल 13 व षटक टाकत होता. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमदची जोडी मैदानावर होती. या जोडीने मागचे काही सामने RCB ला जिंकून दिले आहेत. काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात दोघांमध्ये गोंधळ उडाला. ज्याची किंमत दिनेश कार्तिकला त्याच्या विकेटच्या रुपाने चुकवावी लागली. खरंतर हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
Running VK-DK out – just a Yuzi thing. ?? pic.twitter.com/riWyhNbLgP
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 26, 2022
तुम्ही म्हणाल इतक्या धावा हव्या असताना टर्निंग पॉइंट कसा काय?
धाव फलकावर संघाच्या 72 धावा असताना दिनेश कार्तिक रनआऊट झाला. दिनेश कार्तिक बाद होणारा बँगलोरचा सहावा खेळाडू होता. विजयासाठी RCB ला अजून 72 धावांची आवश्यकता होती. तुम्ही म्हणाल इतक्या धावा हव्या असताना टर्निंग पॉइंट कसा काय?. त्याचं असं आहे की, दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एकहाती सामना फिरवण्या इतपत त्याची क्षमता आहे. कारण तो बाद झाल्यानंतर त्याच्या ताकदीचा दुसरा खेळाडू नव्हता. म्हणून आम्ही दिनेशच्या बाद होण्याला सामन्याचा टर्निंग पॉइंट म्हणतोय.
चेंडू पकडला, सुटला आणि कार्तिक RUNOUT, मोठा ड्रामा असलेला VIDEO इथे क्लिक करुन पहा
नाट्यमय घटना, दिनेश कार्तिक असा रनआऊट झाला
युजवेंद्र चहलच्या या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला. दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन शाहबाज अहमदकडे स्ट्राइक दिली. चौथ्या चेंडूवर शाहबाजने डिफेंस केला. दोघांनी एकेरी चोरटी धाव पळण्याचा प्रयत्न केला. शाहबाज अहमदने कॉल दिला होता. दिनेश कार्तिक खेळपट्टीवर अर्ध्यापर्यंत पोहोचला होता. पण शाहबाजने आपलं मन बदललं. त्याने दिनेशला माघारी जाण्यास सांगितलं. या दरम्यान प्रसिद्ध कृष्णाने चेंडू अडवून नॉन ,स्ट्र्इक एंडला चहलकडे फेकला. चहलने चेंडू पकडला, तो स्टम्पला चेंडू लावणार इतक्यात चेंडू हातातून निसटला. त्यामुळे कार्तिकला थोडा वेळ मिळाला. कार्तिक क्रीझमध्ये पोहोचणारच होता, इतक्यात चहलने पुन्हा चेंडू पकडून स्टम्पसला लावला. थोड्याशा फरकाने दिनेश कार्तिक रनआऊट झाला. हा सर्व प्रकार खूपच नाट्यमय होता.