IPL 2022: हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स संघाला मोठा झटका, प्रमुख खेळाडूने घेतली माघार

IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला मोठा झटका बसला आहे.

IPL 2022: हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स संघाला मोठा झटका, प्रमुख खेळाडूने घेतली माघार
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 9:59 AM

नवी दिल्ली: IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने (Jason Roy) आयपीएल 2022 स्पर्धेतून माघार घेतली आहे. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना मोठा काळ बायो बबलमध्ये काढावा लागणार आहे. त्यामुळेच जेसन रॉयने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या आठवड्यातच रॉयने याची माहिती अहमदाबाद फ्रेंचायजीला दिली होती. जेसन रॉयची जागा आता कोण घेणार? ते अद्याप गुजरात टायटन्सने जाहीर केलेलं नाही. आयपीएल 2022 ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइसमध्ये रॉयला विकत घेतलं होतं. आयपीएलमधून माघार घेण्याची जेसन रॉयची ही दुसरी वेळ आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सने त्याला दीडकोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. पण व्यक्तीगत कारणं सांगून त्याने माघार घेतली होती.

सलामीसाठी आता कोण?

जेसन रॉयची माघार हा गुजरात टायटन्ससाठी नक्कीच मोठा धक्का आहे. त्यांच्याकडे सलामीसाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीयत. शुभमन गिलसोबत आता त्यांना नवीन ओपनर शोधावा लागणार आहे. गुजरात टायटन्स हा जेसन रॉयसाठी आयपीएलमधला चौथा संघ होता. याआधी तो 2017 मध्ये गुजरात लॉयन्स, 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि 2021 मध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी खेळला आहे.

आयपीएल 2021 मध्ये जेसन रॉयला कोणीही विकत घेतलं नाही. मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्याजागी जेसन रॉयचा समावेश करण्यात आला. जेसन रॉयने आयपीएलमध्ये 13 सामन्यात 29.90 च्या सरासरीने 329 धावा केल्या आहेत. 129.01 चा स्ट्राइक रेट होता. जेसन रॉयच्या नावावर दोन अर्धशतक आहेत. दिल्ली आणि हैदराबादसाठी त्याने ही कामगिरी केलीय.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये चांगला खेळ दाखवला होता

31 वर्षाच्या या इंग्लिश क्रिकेटपटूने पाकिस्तान सुपर लीग 2022 मध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. रॉय या स्पर्धेत क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघाकडून सहा सामने खेळला होता. पीएसएलमध्ये जेसन रॉयने 50.50 च्या सरासरीने 303 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 170.22 होता. यंदा आयपीएलमध्ये 10 संघ आहेत. मुंबई आणि पुण्यात सर्व सामने होणार आहेत. लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने होतील. दोन महिने ही स्पर्धा चालणार आहे. आयपीएल स्पर्धा 26 मार्चपासून सुरु होईल. 29 मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

Ipl 2022 Shock to hardik pandyas gujarat titans team jason roy pulled out of Tournament

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.