IPL 2022 सुरु होण्याआधीच काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबादला मोठा झटका, पहिली विकेट पडली

IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच काव्या मारनच्या Sunrisers Hyderabad संघाला मोठा झटका बसला आहे. ऑक्शननंतरच्या पहिल्या चार दिवसात SRH ची पहिली विकेट पडली आहे.

IPL 2022 सुरु होण्याआधीच काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबादला मोठा झटका, पहिली विकेट पडली
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 10:02 AM

हैदराबाद: IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच काव्या मारनच्या Sunrisers Hyderabad संघाला मोठा झटका बसला आहे. ऑक्शननंतरच्या पहिल्या चार दिवसात SRH ची पहिली विकेट पडली आहे. सपोर्ट स्टाफमधून पहिला राजीनामा आला आहे. ऑरेंज आर्मीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फ्रेंचायजीचे सहाय्यक कोच सायमन कॅटिच (Simon Kaitich) यांनी राजीनामा दिला आहे. IPL 2022 Mega Auction नंतर कॅटिच यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. सायमन कॅटिच यांनी राजीनामा का दिला? त्याच कारण अजून स्पष्ट नाहीय. पण आयपीएल ऑक्शनमध्ये फ्रेंचायजींची रणनिती त्यांना पटली नव्हती. त्यामुळे त्यांनी आपलं पद सोडलं, News Corp ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. आयपीएल स्पर्धा सुरु व्हायला महिन्याभराचा कालावधी उरलेला असताना सायमन कॅटिच यांनी राजीनामा दिला आहे. SRH साठी निश्चिच हा एक झटका आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मुडी सनरायजर्स हैदराबादचे हेड कोच आहेत. सायमन कॅटिच आणि मुडी एकासंघातून खेळले आहेत. Sunrisers Hyderabad संघाने दोनवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे.

कॅटिच यांना ऑक्शनची रणनिती पटली नव्हती

आयपीएल ऑक्शनसाठी केलेल्या टीम प्लानिंगवर सायमन कॅटिच समाधानी नव्हते. त्यांना ती रणनिती मान्य नव्हती. संघाच्या निवडीवर ते खूष नव्हते. कॅटिच यांच्या राजीनाम्याला SRH फ्रेंचायजीने डेविड वॉर्नरला विकत घेतलं नाही, त्याच्याशी जोडलं जात आहे. News Corp ने हे वृत्त दिलं आहे.

SRH ने मागच्या आयपीएल सीजनमध्ये खूपच खराब कामगिरी केली होती. टीमने मध्यावरच आपला कर्णधार बदलला होता. 2016 मध्ये SRH ला जेतेपद मिळवून देणाऱ्या डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवलं होतं. त्याच्याजागी केन विलियमसनची नियुक्ती केली होती. या सीजनमध्ये टीमने राशिद खानलाही रिटेन केलं नाही.

असा आहे SRH चा संघ वॉशिंग्टन सुंदर- 8.75 करोड रुपये निकोलस पूरन- 10.75 करोड रुपये टी. नटराजन- 3.6 करोड रुपये भुवनेश्वर कुमार- 4.20 करोड रुपये प्रियम गर्ग- 20 लाख रुपये राहुल त्रिपाठी- 8.50 करोड रुपये अभिषेक शर्मा- 6.5 करोड रुपये कार्तिक त्यागी -4 करोड रुपये श्रेयस गोपाल- 75 लाख रुपये जगदीश सुचित- 20 लाख रुपये एडन मार्करम- 2.60 करोड रुपये मार्को जॅनसेन- 4.20 करोड रुपये रोमारियो शेफर्ड- 7.75 करोड रुपये सीन एबॉट- 2.40 करोड रुपये आर. समर्थ- 20 लाख रुपये सौरभ दुबे- 20 लाख रुपये शशांक सिंह- 20 लाख रुपये विष्णु विनोद- 50 लाख रुपये ग्लेन फिलिप्स- 1.5 करोड रुपये फजलहक फारूखी- 50 लाख रुपये

ipl 2022 simon katich sensationally quits sunrisers hyderabad after mega auction

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.