IPL 2022 SRH vs LSG Live Streaming: जाणून घ्या लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
सनरायझर्ससाठी पहिल्या सामन्यात काहीही चांगले झाले नाही. या सामन्यात ना संघाची फलंदाजी चालली ना गोलंदाजी. संघाने कर्णधार बदलला असला तरी संघाचा कामगिरीत फारसा बदल झाल्याचं अद्याप पाहायला मिळालेलं नाही.
मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 12 वा सामना के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) संघ सोमवारी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात लखनौचा संघ उत्कंठावर्धक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मैदानात उतरणार आहे. यापूर्वी लखनौने गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना केला आहे. दुसरीकडे, सनरायझर्सने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि त्यात राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला आहे. यावेळी हे दोन्ही संघ नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. यंदाच्या हंगामात या मैदानावर दोन्ही संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत. या सामन्याद्वारे लखनौचा संघ विजयी कामगिरी कायम राखण्याचा प्रयत्न करेल, तर सनरायझर्स संघाला विजयाचे खाते उघडायचे आहे.
सनरायझर्स हैदराबादसाठी पहिल्या सामन्यात काहीही चांगले झाले नाही. या सामन्यात ना संघाची फलंदाजी चालली ना गोलंदाजी. संघाने कर्णधार बदलला असला तरी संघाचा कामगिरीत फारसा बदल झाल्याचं अद्याप पाहायला मिळालेलं नाही. अशा परिस्थितीत त्यांना या फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचवेळी लखनौचा शेवटचा सामना शानदार ठरला होता. पहिल्या सामन्यातही त्यांनी चांगली कामगिरी केली होती, पण अखेरच्या क्षणी त्यांनी सामना गमावला. लखनौचा संघ चेन्नईला नमवून आला असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 4 एप्रिल (सोमवार) रोजी खेळवला जाणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता
इतर बातम्या