MI Suryakumar yadav IPL 2022: विराट कोहलीला मैदानावर खून्नस का दिली? अखेर सूर्यकुमार यादवने सोडलं मौन
MI Suryakumar yadav IPL 2022: आयपीएल सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये स्लेजिंग, वादावादी पहायला मिळते. काहीवेळा खेळाडू आवेशात परस्परांच्या अंगावर धावून जातात.
मुंबई: आयपीएल सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये स्लेजिंग, वादावादी पहायला मिळते. काहीवेळा खेळाडू आवेशात परस्परांच्या अंगावर धावून जातात. त्या क्षणाला त्यांच्या मनामध्ये ती आक्रमकता भरलेली असते. काल राजस्थान रॉयल्स आणि केकेआर (RR vs KKR) विरुद्धच्या सामन्यादरम्यान एरॉन फिंच आणि प्रसिद्ध कृष्णामध्ये असाच संघर्ष पहायला मिळाला. दोन वर्षांपूर्वी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे टीम इंडियातून खेळणारे दोन खेळाडू आयपीएल सामन्यादरम्यान परस्परांना भिडले होते. विराट कोहली आक्रमकता आणि मैदानावर स्लेजिंग करण्यातही मागे नसतो. आयपीएल 2020 मध्ये सूर्यकुमार यादवने कोहलीला तसचं उत्तर दिलं होतं. दोघांमध्ये मैदानात शाब्दीक बाचाबाची झाली होती. त्यावर सूर्यकुमार यादव आता व्यक्त झाला आहे. सामना सुरु असताना कोहलीशी पंगा का घेतला? नेमकं त्यावेळी काय झालं होतं? त्या बद्दल मुंबई इंडियन्सच्या या स्टार फलंदाजाने सांगितलं.
त्या दिवशी मी ठरवलं होतं, पण….
‘मी कोहलीसोबत जाणीवपूर्वक वाद घातला नव्हता’ असं सूर्यकुमारने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो मध्ये बोलताना सांगितलं. “सामन्यादरम्यान अचानक ते सर्व घडलं. विराट कोहली मैदानावर असताना, त्याच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते. तो सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. कोहली त्या दिवशी भरपूर स्लेजिंग करत होता. काहीही झालं, तरी न बोलता खेळावर लक्ष केंद्रीत करायचं, असं मी ठरवलं होतं”, असं सूर्यकुमार म्हणाला.
माझ्या ह्दयाचे ठोके वाढले होते
“चेंडू निघून गेल्यानंतर कोहलीने माझ्याकडे बघितलं. त्यावेळी मी त्याला खुन्नस दिला. ते सर्व अचानक घडलं. मी काही ठरवून केलं नाही. मी तोंडात च्युईंगम चघळत होतो. आतून मला भिती वाटत होते. माझ्या ह्दयाचे ठोके वाढले होते. कोहलील कुठलही प्रत्युत्तर देऊ नकोस, असं मला माझा आतला आवाज सांगत होता” असं सूर्यकुमारने सांगितलं.
That stare, that damned stare ?? and clearly Suryakumar Yadav won it. You don’t get to see any player especially an Indian giving it back to Kohli. Absolutely loved the confidence and cold aggression in that stare ?#RCBvsMI #MIvsRCB pic.twitter.com/0Jy9BqHgeG
— Adarsh (@BeingAdarshhh) October 28, 2020
मिळालेल्या संधीचं सोनं केलं
सूर्यकुमारने त्यावर्षी मॅच विनिंग खेळी केली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी सूर्यकुमारला टीम इंडियात संधी मिळाली. सूर्यकुमार यंदाच्या सीजनमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. त्याशिवाय टीम इंडियाकडून मिळालेल्या संधीचही त्याने सोनं केलं. बऱ्याच प्रतिक्षेनंतर त्याला भारतीय संघाकडून संधी मिळाली. सूर्यकुमारनेही दमदार खेळ दाखवण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ संघर्ष करतोय. पण सूर्यकुमारच्या बॅट मधून धावांचा ओघ सुरु आहे.