Delhi Capitals Rishabh Pant: ऋषभ पंतचं लाखो रुपयाचं नुकसान, पराभवापाठोपाठ आणखी एक मोठं दु:ख
LSG vs DC IPL Match Result: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) काल केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) पराभव केला. लखनौने 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला.
मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) काल केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) पराभव केला. लखनौने 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. पराभवानंतर निराश होणं स्वाभाविक आहे, दिल्लीचा संघ सुद्धा याला अपवाद नाही. दिल्ली कॅपिटल्सची टीम पराभवाच्या दु:खात असतानाच त्यांचं पैशांचही मोठ नुकसान झालं आहे. कालच्या सामन्यात झालेल्या चूकीमुळेच दिल्ली कॅपिटल्सचं हे नुकसान झालं आहे. लखनौने काल विजयाची हॅट्रिक केली. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुष बदोनीने (Ayush Badoni) चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना झाला. मागच्या तीन सामन्यातील दिल्लीचा हा दुसरा पराभव आहे. लखनौ सुपर जायंट्सने आपला चौथा सामना खेळताना तिसरा विजय मिळवला.
कारवाई झालेला तिसरा कॅप्टन
ऋषभ पंतचं 12 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने षटकाची गती धीमी राखल्याबद्दल ऋषभ पंतला हा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटबद्दल यंदाच्या सीजनमध्ये कारवाईची ही तिसरी वेळ आहे. ऋषभ पंत दंड भरणारा तिसरा कर्णधार ठरला आहे.
याआधी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघांना षटकांची गती धीमी राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि केन विलियमसनने दंड भरला आहे. त्यामुळे 12 लाख रुपयांच नुकसान झालेला ऋषभ पंत आयपीएल 2022 मधला तिसरा कॅप्टन आहे.
Super Giants hai hum. Jalwa hai yahan humaara! ? LSG beat DC by 6 wickets.#AbApniBaariHai?#IPL2022 ? #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/8uwxIDbcAU
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 7, 2022
दिल्ली कॅपिटल्सचा पराभव का झाला?
दिल्ली कॅपिटल्सला पृथ्वी शॉ ने चांगली सुरुवात करुन दिली. पावरप्लेमध्ये दिल्लीच्या बिनाबाद 52 धावा झाल्या होत्या. पृथ्वीने 34 चेंडूत 61 धावांची खेळी केली. पण पृथ्वी आऊट झाल्यानंतर सात धावात दोन विकेट गेल्या. डेविड वॉर्नर आणि रोव्हमॅन पॉवेल हे पावर हिटर आहेत. पण दोघेही लौकीकाला साजेसा खेळ दाखवू शकले नाहीत. वॉर्नर चार आणि पॉवेल तीन धावांवर आऊट झाला.