IPL 2022: T 20 मध्ये गुजरातचं सक्सेस मॉडल, GT ने स्पेशलिस्ट ऐवजी मल्टी टास्किंग प्लेयर्स निवडले, समजून घ्या यशाचं रहस्य

IPL 2022 साठी फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. ऑक्शननंतर गुजरात एक परिपूर्ण संघ नाहीय, अस अनेक एक्सपर्ट्सचं मत होतं. GT ची टीम लीगमध्ये चागला परफॉर्मन्स देऊ शकणार नाही, असं त्यांना वाटत होतं.

IPL 2022: T 20 मध्ये गुजरातचं सक्सेस मॉडल, GT ने स्पेशलिस्ट ऐवजी मल्टी टास्किंग प्लेयर्स निवडले, समजून घ्या यशाचं रहस्य
IPL 2022 Gujarat Titans Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 1:39 PM

Gujarat Titans ने आपल्या पहिल्याच सीजनमध्ये IPL किताब जिंकून इतिहास रचला आहे. 2008 नंतर पहिल्यांदाच कुठल्यातरी संघाने असा कारनामा केलाय. 2008 साली राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पहिल्याच सीजनमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. गुजरातचा हा विजय अनेकांना आश्चर्यकारक वाटेल, पण क्रिकेटच्या ग्लोबल ट्रेंडवर नजर टाकली, तर सामना जिंकण्यासाठी गुजरातकडे सर्व आयुध उपलब्ध होती. मोठ्या खेळाडूंवर अवलंबून न राहता गुजरातने एक संतुलित संघ कसा बांधला?गुजरातला पहिल्याच सीजनमध्ये असा कारनामा करणं, कशामुळे शक्य झालं. त्यांची वैशिष्ट्य काय होती, त्यावर एक नजर मारुया. गुजरातने आज मिळवलेलं यश अनेक अंगांनी कौतुकास्पद आहे. ज्यांच्यावर कोण विश्वास ठेवत नव्हतं, त्या टीमने अव्वल स्थान गाठलय.

1 मल्टी टास्किंग खेळाडूंचा भरणा

IPL 2022 साठी फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. ऑक्शननंतर गुजरात एक परिपूर्ण संघ नाहीय, अस अनेक एक्सपर्ट्सचं मत होतं. GT ची टीम लीगमध्ये चागला परफॉर्मन्स देऊ शकणार नाही, असं त्यांना वाटत होतं. एक-दोन खेळाडू सोडल्यास गुजरातकडे मोठे खेळाडू नव्हते, म्हणून क्रिकेट एक्सपर्ट्स गुजरातला विजेते म्हणून पसंती देत नव्हते. आता आयपीएलचा हंगाम संपला आहे. आता मागे वळून पाहिल्यास, मोठे खेळाडू गुजरातच्या संघात नव्हते, तोच त्यांचा प्लस पॉइंट होता. संघात मल्टी टास्किंग खेळाडूंचा भरणा होता. म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या रोलमध्ये फिट बसणार खेळाडू या संघात होते.

कामचलाऊ म्हटल्यास, हरकत नाही. पण गुजरातकडे प्रत्येक सामन्यात चार-ऑलराऊंडर खेळाडू होते. त्याशिवाय संघामध्ये असलेले दोन विकेटकिपर ऋदिमान साहा आणि मॅथ्यू वेड सलामीला येऊन फलंदाजी करण्यासाठी सक्षम होते. गुजरातचा या सीजनमधला संघ हा मागच्या टी 20 वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाशी साम्य साधणारा होता. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल मार्श, मार्कस स्टॉयनिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे मल्टी टास्किंग खेळाडू उपलब्ध होते.

2 पावर प्ले मध्ये घाई दाखवली नाही

काही वर्षांपूर्वी पावर प्लेमध्ये धमाकेदार बॅटिंग म्हणजे टी 20 क्रिकेटमध्ये यश, असं समजलं जायचं. पण हा ट्रेंड आता बऱ्याच प्रमाणात बदललाय. पावरप्लेमध्ये विकेट वाचवून मधल्या षटकात वेगाने धावा करणारे संघ टी 20 क्रिकेटमध्ये यशस्वी ठरतायत.

मागच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांनी हाच फॉर्म्युला वापरला. पाकिस्तानचा बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट टिकवून ठेवायचे. त्यानंतर हल्लाबोल करायचे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श 7 व्या ओव्हरपासून आक्रमक फलंदाजी करायचे. गुजरातने या आयपीएलमध्ये असाच खेळ दाखवला. ऋदिमान साहा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीच्या कामगिरीवर संघाचं यश अवलंबून नव्हतं. हार्दिक पंड्या आणि डेविड मिलरने मधल्या षटकांमध्ये मॅच विनिंग इनिंग्स खेळले.

GT (4)

गुजरात टायटन्सचा 10वा विजय

3 पावर प्लेमध्ये दमदार गोलंदाजी

यंदाच्या सीजनमध्ये पावर प्ले गोलंदाजीत गुजरातची टीम सर्वात यशस्वी आहे. 16 सामन्यात GT च्या गोलंदाजांनी पावरप्लेमध्ये 27 विकेट काढल्या. बहुतांश सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या ओपनर्सना सेटच होऊ दिलं नाही. पावरप्लेमध्ये मोहम्मद शमी गुजरातकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने पावरप्लेमध्ये 11 विकेट काढल्या.

शमीने पहिल्याच सामन्यात पावरप्लेमध्ये 3 विकेट काढल्या. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला सावरण्याची संधीच मिळाली नाही. लॉकी फर्ग्यूसनने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. त्याने पावरप्लेमध्ये 6 विकेट काढल्या. यश दयालने पावरप्लेमध्ये 5 विकेट काढल्या. दुसरे संघ पावर प्लेमध्ये वेगाने धावा काढण्यावर भर देत होते. तिथेच गुजरातची टीम पावरप्ले धावा रोखण्याचा विचार करत होती.

4 परफॉर्म करणारा कॅप्टन

हार्दिक पंड्याला कॅप्टन म्हणून कसं कोण निवडू शकतो? हाच प्रश्न अनेकांना पडला होता. पण त्या सर्व प्रश्नांची उत्तर आता मिळाली आहेत. हार्दिकने स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व केलं. स्वत:च्या परफॉर्मन्समधून सर्वाचीच तोंड बंद केलीत. हार्दिकने संघाला गरज असताना तशा पद्धतीचा परफॉर्मन्स दिला. खेळ दाखवला. ते महत्त्वाचं आहे. हार्दिकने 15 सामन्यात 131 च्या स्ट्राइक रेटने 487 धावा फटकावल्या. त्याने आठ विकेटही घेतले. याच क्वालिटीमुळे भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी त्याचा विचार होतोय.

Gujarat titans skipper Hardik pandya

5 ज्या खेळाडूंना इतर संघांनी धुडकावलं ते GT मध्ये हिरो बनले

डेविड मिलर, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि राहुल तेवतिया या खेळाडूंचा या यादीत समावेश होतो. हे खेळाडू ज्या संघांकडून खेळायचे, त्या फ्रेंचायजींनी त्यांना रिटेन करण्यालायक नाही समजलं. त्यामुळे या खेळाडूंमध्ये आपल्या जुन्या फ्रेंचायचीला चुकीचं सिद्ध कण्याची एक जिद्द निर्माण झाली. त्यातून खेळाडूंमध्ये बाँडिंग निर्माण झाली. मिलरला तर मेगा ऑक्शनच्या पहिल्या राऊंडमध्ये खरेदीदारच मिळाला नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये गुजरातने त्याला विकत घेतलं. ज्या मिलरला राजस्थानने रिलीज केलं. त्यानेच क्वालिफायर 1 आणि फायनलमध्ये राजस्थान विरुद्ध विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Gujarat Titans

राहुत तेवतिया सुद्धा राजस्थान रॉयल्सचा भाग होता. त्याने पंजाब किंग्स विरुद्ध षटकारांचा पाऊस पाडून मॅच फिनिश केली होती. याच तेवतियाने पंजाब विरुद्ध शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकून गुजरात संस्मरणीय विजय मिळवून दिला. तेवतिया अनेक सामन्यात संकट मोचक ठरला.

मोहम्मद शमी पंजाबच्या वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळायचा. तरी फ्रेंचायजीने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. PBKS ची टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकली नाही. शमीच्या गोलंदाजीच्या बळावर गुजरातच्या टीमने विजेतेपद मिळवलं.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या जागी 35 वर्षीय कायरन पोलार्डला पसंती दिली. निकाल समोर आहे. मुंबई इंडियन्सने सलग आठ सामने गमावले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.