IPL 2022 with TV9 : TOP 9 गोष्टी, ज्या पहिल्या Match आधी जाणून घ्यायलाच हव्या! Mankading चा नियमही खास का ठरणार?
IPL 2022 with TV9 यंदा आयपीएलमध्ये (IPL) आठऐवजी दहा संघ स्पर्धेत उतरले आहेत, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोघांची भर यावर्षीपासून आयपीएलच्या सीझनमध्ये पडली आहे.
मुंबई: यंदा आयपीएलमध्ये (IPL) आठऐवजी दहा संघ स्पर्धेत उतरले आहेत, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोघांची भर यावर्षीपासून आयपीएलच्या सीझनमध्ये पडली आहे. दहा संघामुळे आयपीएलमधील सामन्यांची संख्याही वाढली आहे. वाढलेल्या संघांमुळे आयपीएलचा नव्या आणि हटके फॉरमॅटही यंदा पाहायला मिळेल. यंदा 60 ऐवजी 74 सामने आयपीएलमध्ये बघायला मिळणार आहेत. धोनी आणि विराट कोहली यावेळी कोणत्याही संघाचे कर्णधार म्हणून नाही, तर खेळाडू म्हणून त्या-त्या संघाचा भाग असणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) पहिला सामना होत आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील एक फेव्हरेट संघ आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत चार विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई संघाला यंदाही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
यावेळी DRS घेण्याची संधी दोनदा मिळणार आहे. दोन्ही इनिगंवेळी दोन-दोन डीआरएस प्रत्येक संघाला घेता येऊ शकेल.
एमसीसीनं शोध लावलेला मांकडिंगचा नियम आयपीएलमध्ये लागू करण्यात आला आहे.
स्टेडिअमध्ये 25 टक्के प्रेक्षकांना थेट प्रवेश देत सामन्याचा आनंद घेता येईल,. गेल्या वर्षी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यानंतर आता भारतात होणाऱ्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली असली, तर क्रीडा चाहत्यांना लाईव्ह मॅचचा आनंद थेट मैदानातून घेता येऊ शकणार आहेत.
बायो बबलचा नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाई करत त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. दंडाची रक्कम किती असेल, हे कळू शकलेलं नाही. मात्र मोठी रक्कम दंडाच्या रुपात वसूल केली जाऊ शकते, असं बोललं जातंय.
रविंद्र जडेजा, मयंक अग्रवाल, हार्दिक पंड्या, फाफ डुप्लेसी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये फुल टाईम कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे केएल राहुल, श्रेयस अय्यरही नव्या संघांचं नेतृत्तव करताना दिसणार आहेत.
एमसीसीनं शोध लावलेला मांकडिंग नियम म्हणजे काय?
मांकडिंग म्हणजे बॉलिंग टाकताना गोलंदाजानं बॉल फेकण्यासाठी बॉलिंग एन्डवरील बॅट्समन्सला हूल देऊन रनआऊट करणं! आधी अशाप्रकारे रनआऊट करण्याची प्रथा नव्हती. मात्र आता हा नियम अधिकृत करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये याची अंमलबजावणीही केली जाणार आहे.
दरम्यान, जर बॉलरनं रनआऊटसाठी अपिल केलं नाही, तर हा बॉल डेडबॉल मानला जाईल. मांकडिंग आधी रनआऊट कॅटेगिरीमध्ये मोडलं जात नव्हतं. मात्र एमसीसीनं म्हणजेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट कल्बनं केलेल्या संशोधनानंतर अखेर आता हे संशोधन स्वीकारण्यात आलंय. आयपीएलमध्येही या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
माकडिंग असं नावं का दिलंय?
साल होतं 1947. भारताचा माजी फिरकीपटू विनी मांकड या खेळाडून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बिल ब्राऊन याला चकवा दिला होता. मांकडचा बॉल डिलिव्हर होण्याआधीच बिल ब्राऊन रन घेण्यासाठी क्रीझच्या बाहेर धावला. मांकडनं वेळ साधली आणि नॉन स्ट्राईकर एन्डवर बिल ब्राऊनला रन आऊट करत अपिल केलं. विनू मांकड यांच्या नावावरुनच या रनआऊटला मांकडींग असं नाव पडलंय.
दरम्यान, कपिल देवनंही पीटर कर्स्टनलाही माकडींगनं आऊट केलं होत. 1992-93 ला कपिलनं हे काम करुन दाखवलं होतं. तर मुरली कार्तिकनंही रणजी ट्रॉफित बंगालच्या संदीपन दासला मांकडींगनं आऊट केलं होतं. त्यानंतर आपल्याला भारताला फिरकीपटी रवीचंद्रन अश्विन अनेकदा मांकडिंग करताना दिसून आला आहे.