IPL 2022 आयोजनासंबंधी BCCI ची शनिवारी मोठी बैठक, होणार महत्त्वाचे निर्णय
भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दलही (IPL 2022) बऱ्याच चर्चा सुरु आहेत.
मुंबई: भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दलही (IPL 2022) बऱ्याच चर्चा सुरु आहेत. यावर्षी एप्रिल-मे मध्ये आयपीएलचा सीजन होणार आहे. 10 टीम्स या मोसमात सहभागी होणार आहेत. मुख्य स्पर्धेआधी मेगा ऑक्शन पार पडेल. हे मेगा ऑक्शन कुठे आणि कधी होणार? या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. याच सर्व मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय (BCCI) 22 फेब्रुवारीला सर्व फ्रेंचायजींसोबत महत्त्वपूर्ण बैठक करणार आहे. या बैठकीत ऑक्शनच्या तारखेसह स्पर्धेचे स्थान आणि स्पर्धा भारतात खेळवायची की, बाहेर या संबंधी सुद्धा निर्णय होईल.
फ्रेंचायजी बरोबर काय चर्चा करणार? शनिवारी होणाऱ्या या बैठकीत बोर्ड सामन्याच्या स्थळांबद्दल फ्रेंचायजींबरोबर चर्चा करणार आहे. स्पर्धेच्या 15 व्या सीजनची सुरुवात दोन एप्रिलपासून होणार आहे. पण स्थळाबद्दल अजून स्पष्टत नाहीय. मागच्यावर्षी बीसीसीआयने स्पर्धेचे आयोजन भारतात केले होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे 29 सामन्यांनंतर सीजन थांबवावा लागला होता. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये यूएईमध्ये सीजन पूर्ण करण्यात आला.
देशाबाहेर स्पर्धा जाणार असेल तर, कुठल्या देशाला पसंती? भारतातच स्पर्धा आयोजित करण्याचे सर्व प्रयत्न सुरु आहेत, हा विश्वास बोर्डाला सर्व फ्रेंचायजींना द्यायचा आहे. मुंबई आणि पुण्यात आयपीएल स्पर्धा आयोजित होऊ शकते. देशाबाहेर स्पर्धा जाणार असेल, तर यूएई, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचं नाव चर्चेत आहे. अजूनपर्यंत तरी 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन पार पडेल, अशी चर्चा आहे.
ipl 2022 venue and mega auction date discussion bcci meeting with franchises on 22 january