IPL 2022 Who is RCB Suyash Prabhudessai: पहिल्याच सामन्यात गोव्याच्या मुलाने मन जिंकलं, कोण आहे सुयश प्रभुदेसाई?

IPL 2022 Who is RCB Suyash Prabhudessai: यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू पहायला मिळत आहेत. फलंदाजी, गोलंदाजीने ते लक्षवेधी कामगिरी करत आहेत.

IPL 2022 Who is RCB Suyash Prabhudessai: पहिल्याच सामन्यात गोव्याच्या मुलाने मन जिंकलं, कोण आहे सुयश प्रभुदेसाई?
आरसीबीकडून गोव्याच्या सुयश प्रभूदेसाईचा डेब्यु Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 11:50 PM

मुंबई: यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू पहायला मिळत आहेत. फलंदाजी, गोलंदाजीने ते लक्षवेधी कामगिरी करत आहेत. आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग्सच्या (RCB vs CSK) सामन्यात अशाच एका खेळाडूने लक्षवेधी कामगिरी केली. पदार्पणातच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या एका खेळाडूने लक्ष वेधून घेतलं. हर्षल पटेलच्या (Harshal Patel) जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन झाल्याने तो आपल्या घरी गेला आहे. त्यामुळे हर्षलच्या जागी सुयश प्रभुदेसाईचा (Suyash Prabhudessai) आज संघात समावेश करण्यात आला. 24 वर्षाच्या सुयशने आज RCB कडून आयपीएलमध्ये डेब्यु केला. सुयश प्रभूदेसाई गोव्याकडून खेळतो. आज पहिल्याच सामन्यात सुयशने दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला. सुयशने धोकादायक रॉबिन उथाप्पा आणि मोइन अलीची जोडी जमण्याआधीच फोडली.

एकाहातानेच दिनेश कार्तिककडे थ्रो

सातव्या षटकात ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजी करत होता. मॅक्सवेलचा ऑफ स्टंम्पवरील चेंडू मोइन अलीने कट केला. रॉबिन उथाप्पाने धाव घेण्यासाठी कॉल दिला. पण नंतर माघार घेतली. त्याचवेळी बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या सुयशने चपळाईने चेंडू पकडला व एकाहातानेच दिनेश कार्तिककडे थ्रो केला. कार्तिकने तितक्याच चपळाईने मोइन अली क्रीझमध्ये पोहोचण्याआधीच रनआऊट केलं. मोइन अलीने आठ चेंडूत तीन धावा केल्या.

चेन्नईच्या गोलंदाजांना फटकावलं

गोव्यासाठी खेळणाऱ्या सुयश प्रभुसदेसाईला RCB ने अवघ्या 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं आहे. आरसीबीच्या सराव सामन्यातच त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती. या मॅचमध्ये त्याने 46 चेंडूत 87 धावा फटकावल्या होत्या. मोठे फटके खेळण्याची क्षमता असल्यामुळेच आजच्या सामन्यात त्याला संधी दिली. सुयश प्रभुदेसाईने आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 18 चेंडूत 34 धावांची वेगवान खेळी केली. यामध्ये त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला.

असा आहे फर्स्ट क्लासचा रेकॉर्ड

सुयश आतापर्यंत 19 फर्स्ट क्लास सामन्यांसह 34 लिस्ट ए चे सामने खेळला आहे. फर्स्ट क्लासमध्ये त्याने 1158 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि आठ अर्धशतकाचा समावेश आहे. 22 टी 20 सामन्यात त्याने 31.64 च्या सरासरीने 443 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लासमध्ये त्याने आठ विकेट घेतल्या आहेत.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.